

पुणे: विद्याध्यांनी अपेक्षित अध्ययननिष्पत्ती संपादित केली आहे की नाही तसेच त्यांच्या अध्ययन प्रक्रियेत कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, है तपासण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संकलित मुल्यमापन चाचणी-१ घेण्यात येणार आहे.
या चाचणीमध्ये प्रथम माषा, गणित आणि तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांचा समावेश आहे विद्याथ्यांच्या इवतेनुसार लेखी तसेच तोंडी स्वरूपाच्या चाचण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. चावणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन निष्पाती कितपत साध्य झाली आहे, याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करता येणार आहे. चाचणीचा मुख्य उद्देश केवळ विद्यार्थ्यांना गुण देणे नसून अध्ययनातील उणिवा शोधून त्यावर उपाययोजना करणे, हा आहे.
चाचणीच्या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांची अध्ययननिष्पत्ती समजून घेऊन आवश्यक त्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कृती कार्यक्रम सबविष्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवाधात पहिली, तर एप्रिल २०२७मध्ये दूसरी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पहिल्या चाचणीत विद्याथ्यांची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर त्यानुसार अध्यापनात आवश्यक बदल करून दुसऱ्या चाचणीपूर्वी अध्ययननिष्पत्ती सुधारण्याची संधी शाळांना मिळणार आहे.
प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवा
चाचणीच्या प्रश्नपत्रिका शाळांना उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांची सुरक्षितता राखण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. प्रश्नपत्रिका फाटणे, पावसामुळे खराब होणे किंवा इतर कोणत्याही कारणाने नुकसान होऊ नये, यासाठी त्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिकांचे वितरण, वापर आणि संकलनाची अथाबदारी संबंधित अधिका-यांवर राहणार आहे. चाचणीच्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील, याचीही शाळांनी दक्षता घ्यायची आहे. दिव्यांग विद्याध्यर्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या गरजेनुसार विशेष तज्ज्ञ अथवा विशेष शिक्षकांची मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गुणांवरून कारवाई नाही...
पहिल्या चाचणीमध्ये विद्यालयांना मिळालेल्या गुणांच्या आधारे कोणत्याही विद्याध्यांवर शैक्षणिक कारवाई करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. चाचणीचा उपयोग विद्याप्यर्याच्या आध्ययनातील गरजा ओळखून प्रभावी उपाययोजना करण्यासाठी करायचा आहे. 'चाचणी म्हणजे विद्यार्थ्यांना गुण देण्यासाठी नव्हे, तर त्यांचे अध्ययन अधिक प्रभावी करण्यासाठी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.