Rajgad Rice Crop Damage: राजगडमध्ये कडक उन्हाचा भात पिकाला फटका; शेकडो हेक्टर शेती करपली

दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल; पाच हजार हेक्टर भात क्षेत्रावर संकट, ई-पीक पाहणीचे प्रशासनासमोर आव्हान
Crop Damage
Crop DamagePudhari
Published on: 
Updated on: 

वेल्हे: तांदूळाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजगड तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाला कडक उन्हाचा फटका बसला आहे. ई-पीक पाहणीसाठी शनिवारी (दि. ३) आलेले राजगडचे तहसीलदार निवास ढाणे यांच्यासह अधिकारी पिकांची गंभीर स्थिती पाहून गहिवरले. राज्य शासनाने दुष्काळी तालुका म्हणून राजगडचा समावेश केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पककांची भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने भात व इतर खरीप पिकांची पाहणी सुरू केली आहे.

Crop Damage
Sinhagad Road Cleanliness Drive: सिंहगड रस्ता परिसर चकाचक; महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला वेग

ई-पीक पाहणीसाठी ग्राम महसूल अधिकारी, सहायकांची पथके नियुक्त केली आहेत. शनिवारी राजगड भागातील खांबवडी व इतर गावांत ई-पीक पाहणी तसेच पंचनामा करून राजगडचे तहसीलदार निवास ढाणे यांनी गंभीर स्थितीची माहिती घेतली. यावेळी मंडल अधिकारी राजकुमार यादव, ग्राम महसूल अधिकारी गजानन चोपडे, सहाय्यक तसेच शेतकरी उपस्थित होते. सर्वात गंभीर दुष्काळी स्थिती माळरानावरील भात, खरीप पिकांची झाली आहे. कडक उन्हामुळे भात खाचरे कोरडी ठणठणीत पडली आहेत. भात पिके वाळू लागली आहेत. तोरणा पासलीच्या अठरा गाव मावळात निम्म्याहून अधिक भात शेती करपून गेली आहे.

Crop Damage
Fursungi Water Supply Fee: आठवड्यातून तीन दिवस पाणी; तरी फ्लॅटमागे दोन हजारांचे शुल्क, फुरसुंगीतील रहिवाशांचा सवाल

मेटपिलावरे, वाजेघर, आंबवणे, कोदवडी, तोरणा भागातील निवी, कोदापूर, कादवे, वरसगाव, निगडे मोसे, रुळे, आंबेगाव, शिरकोली, ओसाडे, रांजणे, खामगाव छत्र, कोंडगाव, पाबे, दापोडे, वेल्हे, मांगदरी, वांगणी, कोळवडी, घिसर, अंत्रोली आदी भागांत पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेल्या भात पिकाला मोठा फटाका बसला आहे. पावसाअभावी उत्पन्नावर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांवर उपासमार तसेच बेरोजगारीचे संकट उभे आहे. बहुतेक शेतकऱ्यांची उपजीविका भात पिकावर असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Crop Damage
Otur Crime: ओतूरमध्ये ११ वर्षीय मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; किराणा दुकानदाराला अटक

ई-पीक पाहणी पुर्ण करण्याचे आव्हान

यंदा राजगड तालुक्यात ५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात व २ हजार हेक्टर क्षेत्रावर नाचणी व इतर खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात खरीप पिकांच्या लागवडीखाली ७३ हजार ४०० गट (७/१२) आहेत. त्यापैकी आजपर्यंत १६ हजार ७०० गटांत ई-पीक पाहणीची नोंदणी करण्यात आली आहे. सर्वच डोंगराळ, दुर्गम भाग असल्याने ई पीक पाहणी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे.

Crop Damage
Pune Nagar Road Traffic Jam: नगर रस्त्यावर मेट्रोचे बॅरिकेड्स अन् बेशिस्त पार्किंग; रामवाडी ते पाचवा मैल वाहतूक कोंडीत

आता पाऊस पडला तरी वाळलेली पिके हाती लागणार नाही. तांदूळ मिळणार नाही तसेच जनावरांना खाण्यासाठी पेंढ्याचा चाराही मिळणार नाही.

रमेश शिंदे, माजी सरपंच, केळद

दुष्काळी तालुका जाहीर झाल्याने राजगडच्या शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्यासाठी ७/१२ च्या उताऱ्यात चालू खरीप पिकांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या शेतात जाऊन पिकांची ७/१२ उताऱ्यात नोंदणी करावी.

निवास ढाणे, तहसीलदार, राजगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news