Sinhgad Education Society Schools: सिंहगड संस्थेला मोठा धक्का! पुण्यातील १३ शाळांवर प्रशासक नियुक्त

नऊ माध्यमिक व उच्च माध्यमिक, तर चार प्राथमिक शाळांचा समावेश; विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन होईपर्यंत प्रशासकांकडे कारभार
Sinhagad Institutes
Sinhagad InstitutesPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली असून, संस्थेच्या पुणे जिल्ह्यातील नऊ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवर तसेच प्राथमिकच्या ४ शाळांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. प्राथमिक तसेच माध्यमिकच्या संचालकांनी संबंधित माहिती दिली आहे. येत्या १ मे २०२७ पर्यंत किंवा संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन होईपर्यंत प्रशासकांकडे या शाळांचा कारभार राहणार आहे.

Sinhagad Institutes
Pune Court Employees Strike: पुणे जिल्हा न्यायालयाचे कामकाज ठप्प! ३५ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

सिंहगड संस्थेच्या शाळांमधील शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिका क्रमांक ३४९/२०२६ आणि विविध रिट याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी महत्त्वपूर्ण आदेश दिले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने संबंधित संस्थांचा ताबा घ्यावा किंवा विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.

Sinhagad Institutes
Pune Unauthorized Hoardings: पुण्यात अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाईचा फार्स? सात क्षेत्रीय कार्यालयांची कामगिरी शून्य

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग यांनी संबंधित नऊ शाळांची मान्यता शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

Sinhagad Institutes
Pune Traffic Wardens: पुण्यात ५०० ट्रॅफिक वॉर्डन नियुक्तीचा मार्ग मोकळा; आयुक्तांनी स्थगिती उठवली

मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी त्यांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी प्रशासकीय व्यवस्था कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित प्राथमिक शाळांचा कारभार संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शा‍ळांचा कारभार डॉ. महेश पालकर यांच्या ताब्यात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sinhagad Institutes
Daund Crime: दौंडमध्ये जुन्या वादातून ३१ वर्षीय तरुणाचा खून; दोघांना अटक

एकूण ४५ शाळा आणि महाविद्यालयावर प्रशासक

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या २५ संस्थांवर तंत्र शिक्षण संचालनालयाने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, थकबाकी आणि न्यायालयाच्या आदेशांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच, ७ महाविद्यालयांचा समावेश आहे. या संस्थांवर ३ वर्षांसाठी प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. प्रशासकाकडे संस्थांचा संपूर्ण कारभार राहणार आहे. तसेच, १३ शाळांवरसुध्दा प्रशासक असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.