Daund Crime: दौंडमध्ये जुन्या वादातून ३१ वर्षीय तरुणाचा खून; दोघांना अटक

सोनवडीत मध्यरात्री धारदार शस्त्राने चेहरा आणि डोक्यावर वार; अडीच महिन्यांपूर्वीच्या वादातून हत्या केल्याचा आरोप
Crime News
Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

दौंड: दौंड तालुक्यातील सोनवडी गावच्या हद्दीत सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एका ३१ वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी दौंड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Crime News
PMPML New Buses: पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात मार्च २०२७ पर्यंत ५०० नव्या सीएनजी बस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवडी येथील अरुण अनिल पवार (वय ३१) हे कॉर्डलाईन ते पवार पॅलेस रस्त्यावर एकटे असताना आरोपींनी त्यांना गाठले. त्यांच्या चेहऱ्यावर व डोक्यावर धारदार हत्याराने गंभीर वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या अरुण पवार यांचा त्यात मृत्यू झाला.

Crime News
Pune ST Division Revenue: एसटीच्या पुणे विभागाची विक्रमी कमाई! एकाच दिवसात ३ कोटींचे उत्पन्न

सुमारे दोन ते अडीच महिन्यांपूर्वी अरुण पवार यांनी आरोपी दिनेश विजय पवार (वय २०) याची आई निर्मला पवार यांचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या कारणावरून दिनेशच्या मनात राग होता. त्याच रागातून दिनेश व त्याचा साथीदार रुपेश मिथुन राठोड यांनी संगनमताने हा खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दोघेही सोनवडी (ता. दौंड) येथील रहिवासी आहेत.

Crime News
Court Employees Strike: राज्यातील ३५ हजार न्यायालयीन कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर; न्यायालयीन कामकाज ठप्प होण्याची शक्यता

या प्रकरणी सुनील अनिल पवार (वय ३३, रा. सोनवडी) यांनी फिर्याद दिली. त्यावरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सहाय्यक पोलिस निरीक्षक गवळी यांनी केली असून, पोलीस उपनिरीक्षक ए. एम. बिद्री पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.