Sinhagad Rajgad Leopard: सिंहगड-राजगड परिसरात ५० हून अधिक बिबटे! जुन्नर-शिरूरपेक्षा येथील बिबटे का आहेत

अति दुर्गम डोंगररांगा आणि विपुल शिकारीमुळे बिबट्यांसाठी परिसर पोषक; मात्र, निधी अभावी बिबट्या पकडण्यासाठी वन विभाग हतबल!
Sinhagad Rajgad Leopard
Sinhagad Rajgad LeopardPudhari
Published on
Updated on

वेल्हे : शिरूर, जुन्नरसारखा सपाट सखल प्रदेश राजगड, सिंहगडमध्ये नाही. सिंहगडपासून सह्याद्रीच्या दुर्गम डोंगररांगा थेट रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत पसरल्या आहेत.

Sinhagad Rajgad Leopard
Saswad Nagar Palika Election Party: ‘मतोबा‌’ला प्रसन्न करण्यासाठी ‌‘पोटोबा‌’ची पूजा

जवळपास आठ ते दहा हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्र या भागात आहे. शिकारीसाठी बिबट्यांना दुर्गम डोंगरी प्रदेशातील घनदाट जंगलात दूर अंतरापर्यंत धाव घ्यावी लागते. त्यामुळे त्यांच्यात अधिक आक्रमकपणा आहे.

Sinhagad Rajgad Leopard
Samruddha Panchayat Raj Abhiyan: बारामतीत 'समृद्ध पंचायतराज' अभियानाचा वेग वाढला, वाचा काय आहे ८ सूत्री कार्यक्रम?

याबबत वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे म्हणाले, राजगड तालुका अति दुर्गम असल्याने या भागातील बिबटे इतर प्रदेशातील बिबट्यापेक्षा अधिक धष्टपुष्ट आणि चपळ आहेत. येथील बिबट्याची लांबी साधारण चार ते पाच फूट, तर उंची अडीच फूट आहे. एक मादी तीन ते चार बछड्यांना जन्म देते. आक्रमक पवित्रा आणि दूर अंतराची शिकार करून मादी बछड्यांचे पोषण करते. येथे बछड्यांचे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे.प्राथमिक निरिक्षणात राजगड तालुक्यात 50 हून अधिक बिबटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sinhagad Rajgad Leopard
Baramati Leopard Sighting: बारामतीत बिबट्याचा ‘तो’ फोटो AI जनरेटेड? वन विभागाचा मोठा दावा, नागरिक मात्र...

वन विभाग हतबल

राजगड, सिंहगडच्या जंगलात रानडुक्कर, हरिण, चितळ सांबर अशा वन्यजीवांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे बिबट्यांना जंगलात शिकार मिळत आहे. अलीकडच्या काळात जंगलापर्यंत फार्म हाऊस, हॉटेलसह प्लॉटिंग, रस्ते झाले आहेत. त्यातून बिबटे कुत्री, वासरे, शेळ्या-मेंढ्या अशा लहान जनावरांची शिकार करताना दिसत आहेत. त्यामुळे गुराख्यांसह शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण आहे. फार्म हाऊस, कंपन्या नागरी वस्त्यांमध्ये शिरणाऱ्या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे पुरेसे पिंजरे, यंत्रसामग्री , मनुष्यबळ उपलब्ध नाही.

Sinhagad Rajgad Leopard
Voter Awareness Against Bribery: मत विकू नका! 5-10 हजार रुपयांसाठी पुढची 5 वर्षे यातना सहन करायची वेळ आणू नका

प्राणीगणनेनंतर संख्या निश्चित

राजगडप्रमाणे सिंहगड किल्ल्याच्या चोहोबाजूला असलेल्या जंगलात बिबट्यांची संख्या वाढली आहे. सिंहगड वन विभागाच्या पाहणीत या परिसरात दहाहून अधिक बिबटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. वन्यप्राण्यांची गणना लवकरच होणार आहे. त्यातून सिंहगड, राजगडच्या जंगलात बिबटे व इतर वन्यप्राण्यांची नेमकी माहिती मिळणार आहे.

Sinhagad Rajgad Leopard
Pune Solapur Highway Traffic Diversion: दुरुस्तीसाठी सोलापूर महामार्गावरील ‌‘हा‌’ रस्ता राहणार बंद

रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत पसरलेल्या घनदाट जंगलात बिबट्यांना वन्यप्राण्यांची शिकार मिळत आहे. त्यामुळे शिरूर, जुन्नर तसेच राज्यातील इतर भागाप्रमाणे सिंहगड, राजगडमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी होत नाही. तसेच बिबट्यांच्या हल्ल्यात पाळीव जनावरांचे मृत्यूचे प्रमाणही तुलनेत कमी आहे.

वैशाली हाडवळे, वन परिमंडळ अधिकारी, पानशेत वन विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news