पीएमपी-मेट्रोसाठी एकच तिकीट : दोन्ही प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न

पीएमपी-मेट्रोसाठी एकच तिकीट : दोन्ही प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपी आणि मेट्रोतून आता पुणेकरांना एकाच तिकिटामध्ये प्रवास करता येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही प्रशासन युद्धपातळीवर करीत असून, नुकतीच मेट्रो अधिकारी आणि पीएमपी अध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली. पुणे मेट्रोकडून 'एक शहर एक कार्ड' या अंतर्गत शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच तिकीट यंत्रणा असावी, याकरिता प्रयत्न केले जात आहेत.

त्या अनुषंगाने मेट्रोने 'मेट्रो कार्ड' ही यंत्रणा सुरू केली आहे. हीच यंत्रणा पीएमपीच्या तिकीट यंत्रणेशी कनेक्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासंदर्भात नुकतीच पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांची मेट्रो अधिकार्‍यांशी चर्चा झाली. त्या वेळी त्यांनी मेट्रो, पीएमपी तिकीट यंत्रणा एकत्र करण्यासंदर्भात निर्णय घेतला आणि त्यानंतर याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे.

नुकतीच आमची मेट्रो अधिकार्‍यांसोबत चर्चा झाली आहे. या बैठकीत आम्ही पीएमपी, मेट्रो तिकीट यंत्रणा कनेक्टिव्हिटीसाठी कार्यवाही कशी करता येईल, याबाबत चर्चा केली. त्या अनुषंगाने आमच्याकडून कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे.

– डॉ. संजय कोलते, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

मेट्रो कार्डची यंत्रणा, पीएमपीच्या यंत्रणेला कनेक्ट करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पीएमपीकडून त्यांच्याकडील यंत्रणेत काही बदल केले जाणार आहेत. त्यानंतर मेट्रो कार्ड तिकीट यंत्रणा पीएमपी तिकीट यंत्रणेशी जोडली जाणार आहे. यामुळे पीएमपी, मेट्रो या दोन्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून पुणेकरांना प्रवास करता येणार आहे.

– हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news