‘पुढारी कस्तुरी क्लब, सोनी मराठी’ आयोजित ‘श्रावण मेळा’ कार्यक्रम गुरुवारी

‘पुढारी कस्तुरी क्लब, सोनी मराठी’ आयोजित ‘श्रावण मेळा’ कार्यक्रम गुरुवारी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'सोनी मराठी'वरील कलाकारांना भेटण्याची संधी… मंगळागौरचे धम्माल खेळ… उखाण्यांची अनोखी स्पर्धा… मानाचा आहेर मिळविण्याची सुवर्णसंधी अन् कस्तुरी क्लबचे सदस्यत्व महिलांना गुरुवारी (दि. 24) बहारदार कार्यक्रमातून मिळणार आहे. 'पुढारी कस्तुरी क्लब' आणि 'सोनी मराठी' आयोजित 'श्रावण मेळा' या अनोख्या कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषेत महिलांना मंगळागौर खेळाचा आनंद लुटता येणार आहेच; शिवाय महिलांसाठी उखाणा स्पर्धा होईल. तर, 'सोनी मराठी'वरील कलाकारही महिलांशी संवाद साधणार असून, श्रावणानिमित्त गप्पा, गाण्यांची मैफीलही रंगणार आहे.

'पुढारी कस्तुरी क्लब' नेहमीच महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते. याचाच एक भाग म्हणून हा धम्माल कार्यक्रम आयोजिला असून, 'श्रावण मेळा'मध्ये 'सोनी वाहिनी'वरील 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेतील कलाकार राजवीर म्हणजेच अजिंक्य राऊत आणि आपली आवडती मयूरी म्हणजेच जान्हवी तांबट यांच्यासोबत गप्पा, गाणी अन् रील्स बनविण्याची संधी महिलांना मिळणार आहे.

तर, सोबतच 'इंडियन आयडॉल मराठी'मधील श्वेता दांडेकर, भाग्यश्री टिकले यांच्या सुरेल गायकीने रंगलेली गाणीही महिलांना ऐकायला मिळतील. कलाकारांसोबत गप्पांसह महिलांसाठी उखाणा स्पर्धाही होईल, तर मंगळागौरच्या खेळात महिलांना पारंपरिक वेशभूषेत सहभागी होता येईल. तसेच, यानिमित्त 'कस्तुरी'च्या ग्रुप लिडर्सला 'माहेरचा आहेर' पटकाविण्याची संधीही मिळेल. हा कार्यक्रम पुणे-सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत आयोजिला आहे.

देशरक्षणाचा धागा…

रक्षाबंधनानिमित्त आनंद सराफ यांचे सैनिक मित्रपरिवार यांच्या सहकार्याने दरवर्षी सीमेवरील जवानांना राखी पाठवत असतात. या उपक्रमात सर्व महिलांनाही सहभागी होता येईल. गुरुवारी या कार्यक्रमात येताना राखी व जवानांसाठी पत्र एका पाकिटात स्वतःचे नाव व फोन नंबरसहित कार्यक्रम ठिकाणी ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकावे.

'कस्तुरी क्लब'चे सदस्य होण्याची संधी

कार्यक्रमात उखाणा स्पर्धेसह 'कस्तुरी क्लब 2023'ची सदस्यनोंदणी करता येणार आहे. या वर्षीची सभासद नोंदणी करणार्‍या महिलांना नोंदणी करताच बॉस कंपनीचा टिफीन आणि बॉटल, असे कॉम्बो गिफ्ट मिळणार आहे आणि वेगवेगळ्या सवलतींचे कूपनही मिळतील. मिमासा फुड्स प्रा. लि.कडून रेडी टू कूक ग्रेव्ही पॅकही मिळणार आहे. यासोबतच वर्षभर अनेक कार्यक्रमांची रेलचेल अनुभवता येणार आहे. येणार्‍या प्रथम 700 कस्तुरींना मृणाल पटवर्धन यांच्याकडून आकर्षक गिफ्ट दिले जाणार आहे. कार्यक्रमस्थळी नावनोंदणीची सोय करण्यात आली आहे.

'मानाचा माहेर आहेर'मध्ये मिळणार आकर्षक भेटवस्तू
नॅपकिन बुके (भावना एंटरप्रायजेस), रेडी टू कूक ग्रेव्ही मसाला (मिमासा फूड्स प्रा. लि.), माई मसाले रेडी टू कूक ग्रेव्ही मसाला (माई मसाले), मेहंदी कोन (मृगनयनी मेहंदी), सॅनिटरी नॅपकिन (शीतल फिल्म्स), अत्तर बॉटल (श्यामल मोरे), हेअर टॉनिक (डॉ. अतुल मुजुमदार), मोत्यांची ठुशी (शारदा दातीर गुरुकुल एज्यु. फाउंडेशन), पूजासाहित्य (सद्गुरू निसर्ग उपचार केंद्र), इन्स्टंट ढोकळा पॅक (पल्लवीज फूड), लक्ष्मीहार (डॉ. रितू लोखंडे व डॉ अरुंधती पवार.)

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news