कोल्हापूर : कळंबा जेलमध्ये आणखी तीन मोबाईल हस्तगत | पुढारी

कोल्हापूर : कळंबा जेलमध्ये आणखी तीन मोबाईल हस्तगत

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कळंबा कारागृहातून आणखी तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले. कारागृहातील शेतात मातीच्या ढिगार्‍यात मोबाईल लपविण्यात आले होते. दोन दिवसांत सात मोबाईल हस्तगत करण्यात आल्याने कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शनिवारी (दि. 19) चार मोबाईल हस्तगत करण्यात आले होते. रविवारी (दि. 20) दुपारी सुरक्षा रक्षकांनी घेतलेल्या झडतीत तीन मोबाईल आढळून आले.

त्यापैकी दोन मोबाईलमध्ये सिमकार्ड आढळून आले नाही. तुरुंग अधिकारी भारत पाटील यांनी सोमवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे.

संबंधित मोबाईल कोणी लपविले, कोणामार्फत कारागृहामध्ये आणण्यात आले, कितीवेळा त्याचा वापर झाला आहे याची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button