धक्कादायक ! पुण्यात दहशतवादी संशयित चिनी महिलेची विवाह नोंदणी

धक्कादायक ! पुण्यात दहशतवादी संशयित चिनी महिलेची विवाह नोंदणी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेना : पिंपरी-चिंचवड शहरात राहणार्‍या एका दहशतवादी संशयित चिनी महिलेने पुणे महापालिकेच्या वानवडी क्षेत्रीय कार्यालयाने कागदपत्रे अपूर्ण असतानाही विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. मोशीतील रहिवासी एका चिनी महिलेने बिबवेवाडीमधील निवासी पत्ता असलेल्या एका भारतीय व्यक्तीसमवेत विवाह केल्याचे भासविले. त्यानुसार या महिलेने येरवडा येथील ऑनलाइन मॅरेज ब्युरोमार्फत विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. संबंधित महिला एजंट पुण्यातील वानवडी क्षेत्रीय कार्यालयाकडून हे प्रमाणपत्र काढून देण्याची तयारी दर्शविली.

या एजंटने रक्कम निश्चित करून क्षेत्रीय कार्यालयाकडे विवाह नोंदणीसाठी अर्ज केला. मात्र, संबंधित चिनी महिलेकडे कागदपत्रे नव्हती, त्यामुळे संबधित एजंटने प्रमाणपत्र देण्यास असमर्थता दर्शविली. दरम्यान, यासंबंधीची माहिती समजल्यावर या एजंट महिलेच्या भावाने जादा रकमेची मागणी करून प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शविली. चिनी महिलेने ते दिल्यानंतर एजंट महिलेच्या भावाने वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या माध्यमातून हे प्रमाणपत्र मिळवून दिले. दरम्यान, ही चिनी महिला दहशतवादी संशयित असून, तिची पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीत तिच्याकडे हे प्रमाणपत्र आढळून आले. त्यानुसार आता पिंपरी-चिंचवडच्या दहशतवादविरोधी शाखेने याबाबत पुणे महापालिकेकडून माहिती मागविली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

खोटी कागदपत्रे सादर

संबंधित चिनी महिलेने विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी विवाहाचा फोटोशॉप केलेला एक फोटो दिला. तसेच, जो चिनी पासपोर्ट व अन्य कागदपत्रे दिली, त्याचे भाषांतर करण्यात आलेले नव्हते. विशेष म्हणजे व्हिसा नसताना या महिलेला महापालिकेने नोंदणी प्रमाणपत्र दिले. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news