धक्कादायक! धुमाळवाडीत बापाकडून मुलाची निर्घृण हत्या

file photo
file photo

सांगवी : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील धुमाळवाडी परिसरातील अहिल्यानगर येथे बापाकडून पोटच्या मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना सोमवारी (दि. १३) रात्री घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर येथील लालासाहेब धोंडीबा कोकरे व मुलगा गणेश लालासाहेब कोकरे (वय ३०) यांच्यात घरगुती वादावरून भांडण झाले.

या भांडणात वडील लालासाहेब कोकरे यांनी गणेशच्या डोक्यात गज घालून खून केला. मंगळवारी (दि. १४) सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी माळेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, खूनाची कबुली लालासाहेब कोकरे यांनी दिली असल्याचे किरण अवचर यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news