Shivneri Marathon Junnar: जुन्नरमध्ये चौथी शिवनेरी मॅरेथॉन उत्साहात पार

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी परिसरात देश-विदेशातील हजारो धावपटूंचा सहभाग; साहिल बिबवे व भाग्यश्री भंडारी विजेते
Shivneri Marathon 2026
Shivneri Marathon 2026Pudhari
Published on
Updated on

लेण्याद्री/नारायणगाव: शिवजयंती महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत, थरार, रोमांच आणि प्रचंड जिद्द या सर्वांचा सुरेख संगम घडवत जुन्नरच्या निसर्गरम्य वातावरणात रविवारी (दि.15) चौथी शिवनेरी मॅरेथॉन उत्साहात पार पडली. यात देश-विदेशातील हजारो धावपटूंनी सहभाग घेतला होता.

Shivneri Marathon 2026
Purandar International Airport Farmers Protest: पुरंदर विमानतळ प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन, मोरडे फूड्‌‍स आणि पोल्ट्री बिडर्स कोऑर्डिनेशन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवनेरी मॅरेथॉनचे आयोजन केले होते. या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांत 21.1 किलोमीटर पुरुष गटात साहिल बिबवे तर महिला गटात भाग्यश्री भंडारी हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर केनियाचा चेरुय्योट टू हा 73 मिनिट 31 सेकंद वेळ नोंदवत सर्वाधिक वेगवान खेळाडू ठरला.

Shivneri Marathon 2026
Bhimashankar Mahashivratri Yatra Closed: भीमाशंकरची महाशिवरात्र यात्रा भाविकांविना

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. 5, 10 व 21.1 किलोमीटर या तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन शिवजन्मभूमीचे माजी आमदार अतुल बेनके, नागपूर परिमंडळचे माजी पोलिस महासंचालक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, मोरडे फूड्‌‍सचे हर्षल मोरडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या हस्ते झाले.

या 21.1 किलोमिटर हाफ मॅरेथॉनमध्ये साहिल बिबवे याने 78 मिनिट 8 सेकंद, तर भाग्यश्री भंडारी हेने 93 मिनिट 7 सेकंद ही वेळ नोंदवली. दहा किलोमीटर अंतर गटात पुरुषांत स्वप्निल डोंगरे 36 मिनिट 31 सेकंद तर महिलांमध्ये साक्षी भंडारी 41 मिनिट 51 सेकंद वेळ नोंदवून पहिले आले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

Shivneri Marathon 2026
Pune Municipal Election Analysis: पौड रोड प्रभाग ११ मध्ये काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचा एक, भाजपचा एक जागेवर विजय

किल्ले शिवनेरी परिसरातील मॅरेथॉन मार्गावरील कुसूर, वडज, पारुंडे, काटेडे आणि येणेरे या गावांच्या दुतर्फा असलेली रंगीबेरंगी फुलांची, हिरवीगार भाजीपाल्याची शेती धावपटूंचा उत्साह द्विगुणित करत होती. यामध्ये जुन्नर व परिसरातील स्पर्धकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. अबालवृद्ध धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेऊन शारीरिक क्षमता आणि जिद्दीचा आदर्श घालून दिला.

मुख्य आयोजकांसह शिवाई देवी मंदिर ट्रस्ट, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, जयहिंद शैक्षणिक संकुल आदी संस्थांच्या सहयोगाने ही स्पर्धा सुरक्षित व यशस्वीपणे पार पडली. ग््राामस्थ व विद्यार्थ्यांनी स्पर्धा मार्गावर दुतर्फा उभे राहून टाळ्यांचा कडकडाट, ढोल-ताशांचा गजर आणि ‌’हाऊ इज द जोश‌’च्या घोषणा देत धावपटूंचा उत्साह वाढवला.

Shivneri Marathon 2026
Pune ACB Bribery Cases: पुण्यात लाचखोरीचा विळखा कायम; २०२५ मध्ये १२४ गुन्हे, १८१ अटकेत

धावपटूंचा अनोखा पाहुणचार

मॅरेथॉनमध्ये काही स्पर्धकांनी आपल्या अनोख्या वेशभूषेने लक्ष वेधून घेतले. नऊवारी साडी, मावळा, वारकरी अशा वैविध्यपूर्ण वेशभूषांमध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला. संबळ, ढोलताशे, लेझीम या पारंपरिक वाद्यांनी वातावरणात आणखी रंग भरले. अनेक धावपटूंनीही वाद्यांवर ठेका धरत आनंद व्यक्त केला. तर ज्वारीपासून तयार केलेले नाश्त्याचे पदार्थ, थेट शेतातून धावपटूंना ताजे द्राक्ष, स्ट्रॉबेरी, केळी, चिक्की आदी खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले. फिजिओथेरपी डॉक्टरांचे पथकासह धावपटूंच्या मदतीसाठी 400 हून अधिक स्वयंसेवक तैनात होते. जुन्नरकरांनी केलेल्या या पाहुणचाराने धावपटू भारावून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news