Shivare Land Acquisition Protest: शिवरेत भूसंपादनावरून ग्रामस्थ आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

वारंवार जमीन अधिग्रहणामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून शासकीय योजनांवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा निर्णय समोर आला आहे
Ring Road
Ring RoadPudhari
Published on
Updated on

माणिक पवार

नसरापूर: शिवरे (ता. भोर) परिसरातील विविध शासकीय कामांसाठी वारंवार जमिनींचे अधिग्रहण केले जाते. यामुळे गावातील जमिनीचे क्षेत्र कमी होऊन अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यावर शासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे शिवरेकरांत अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे बळजबरीने जमिनी अधिग्रहण केल्यास सर्व शासकीय योजनावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा शिवरे ग्रामस्थांनी घेतला आहे.

Ring Road
Saswad Public Gardens: सासवडमध्ये दोन सार्वजनिक उद्याने बंद; नागरिकांचा रोष वाढला

जाणकाराच्या मते काद्यानुसार पहिली जमीन संपादित केली म्हणून दुसरी घेतली जाऊ शकत नाही, असा थेट कायदा नाही. परिणामी शिवरेमध्ये वारंवार भूसंपादनामुळे गावाचा भूगोल आणि आर्थिक कणा मोडत चालला आहे. झोपेंचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला मात्र त्याचे कोणतेच सोयरसुतक नसल्याचा आरोप होत आहे.

Ring Road
Pune Water Supply Cut: सम-विषम पाणीपुरवठ्याचा फटका; पुणेकरांची पाण्यासाठी धावपळ

शिवरे गावचे भौगोलिक क्षेत्र ८०६ हेक्टर असून त्यापैकी वनविभाग भौगोलिक क्षेत्र २७४ हेक्टर, महसुली क्षेत्र ५३२ हेक्टर आहे. याबाबत शेतकरी सुर्यकांत पायगुडे म्हणाले की, गावातून शिवकालीन जुना पुणे सातारा मार्गासाठी ९० एकर, पुणे - सातारा महामार्गासाठी १५० एकर, रिंगरोडसाठी ११३ एकर जमीन संपादित झाली आहे. तसेच जेजुरी ते हिंजवडी उच्च दाबाची वीजसाठी १३ मनोरे उभारणी होणार आहे. एका मनोऱ्यासाठी पाच गुंठे जागा अधिक ८० मीटर जागा बाधित होणार आहे. तसेच वीजवाहक तारा खाली शेती क्षेत्र बाधित होणार आहे.

Ring Road
Pune Office Assistant Salary: १२ ते १५ हजारांच्या पगारात संसाराची कसरत; पुण्यातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा संघर्ष

शिवरे येथील जमिनींचे मोठ्या प्रमाणावर संपादन प्रस्तावित आहे. सातबारा उताऱ्यावर रिंगरोडसाठी आरक्षण पडल्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीवर व कर्जावर तात्पुरता निर्बंध लादले जाणार आहे. वारंवार भूसंपादनामुळे विपरीत परिणाम होणार असल्याची धग पेटत असल्याने आगामी काळात तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

वारंवार विरोध करूनही शासनाकडून भूसंपादन केले जाते. आता शेतकऱ्यांच्या जागांसाठी बळजबरी केल्यास शासकीय योजनांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. तसेच शेतकरी सूर्यकांत पायगुडे, तानाजी डिंबळे, निखिल डिंबळे, धनेश डिंबळे, बाळासाहेब धुमाळ, लक्ष्मण डिंबळे, रघुनाथ डिंबळे, सुनील डिंबळे, मारुती गायकवाड, जगताप भाऊ, विलास कापरे, संदीप कापरे आदींनी आंदोनलनाचा इशारा दिला आहे. (समाप्त)

Ring Road
Cannabis Addiction Among Youth: पुण्यात तरुणांमध्ये गांजाच्या व्यसनाचे वाढते संकट; व्यसनमुक्ती केंद्रे ठरताहेत आशेचा किरण

बंदिस्त एक्स्प्रेसचाही फटका

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा नवीन ८ पदरी बंदिस्त एक्सप्रेसमुळे विकासाला खीळ बसणार आहे. यासाठी शिवरे गावातील क्षेत्र संपादित होणार असून १३० किलोमीटर लांबीचा मार्ग अटल सेतूपासून सुरू होऊन शिवरे गावापर्यंत जोडला जाणार आहे.

रिंगरोडसाठी नव्याने शिवरेचा समावेश

गावामध्ये विविध मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे वारंवार भूसंपादन केले जात आहे. पुणे रिंगरोड आणि मुंबई - पुणे तिसरा द्रुतगती मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी जमिनी संपादित केल्या जात आहेत. शिवरे गावाला बाधित करणाऱ्या प्रमुख प्रकल्प म्हणजे पुणे रिंगरोड, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा पश्चिम रिंगरोड. भोर तालुक्यातील रिंगरोडच्या मूळ रचनेत बदल करून नव्याने शिवरे गावाचा समावेश करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news