Saswad Public Gardens: सासवडमध्ये दोन सार्वजनिक उद्याने बंद; नागरिकांचा रोष वाढला

देखभालअभावी उद्याने बंद असल्याने मुले, ज्येष्ठ नागरिक आणि फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे; प्रशासनाकडे तातडीची मागणी वाढली आहे
Saswad Public Gardens
Saswad Public GardensPudhari
Published on
Updated on

अमृत भांडवलकर

सासवड: शहराच्या वाढत्या नागरीकरणासोबत नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीत सार्वजनिक उद्यानांची भूमिका महत्त्वाची ठरते. सासवड शहरात एकूण सहा सार्वजनिक उद्याने असली, तरी त्यापैकी दोन महत्त्वाची उद्याने गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी उद्यानांवर अवलंबून असलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

Saswad Public Gardens
Pune Water Supply Cut: सम-विषम पाणीपुरवठ्याचा फटका; पुणेकरांची पाण्यासाठी धावपळ

सध्या शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सोपाननगरमधील नाना-नानी पार्क, राणी लक्ष्मीबाई उद्यान आणि गणेशबाग ही चार उद्याने नागरिकांसाठी खुली असून, त्यांचा नियमित वापर होत आहे. यापैकी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात स्वच्छता, देखभाल आणि सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसून येते. उद्यान परिसर स्वच्छ ठेवण्यात आला असून, सुरक्षा रक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या उद्यानाचा लाभ दररोज मोठ्या संख्येने नागरिक घेत आहेत.

Saswad Public Gardens
Pune Office Assistant Salary: १२ ते १५ हजारांच्या पगारात संसाराची कसरत; पुण्यातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा संघर्ष

मात्र, राजमाता जिजाऊ उद्यान आणि आचार्य अत्रे उद्यान ही दोन्ही उद्याने देखभाल व दुरुस्तीअभावी बंद आहेत. या उद्यानांच्या बंद अवस्थेमुळे परिसरातील मुलांना खेळण्यासाठी तसेच नागरिकांना विरंगुळ्यासाठी उपलब्ध असलेल्या सार्वजनिक जागा कमी पडत आहेत. उद्यानांचे दरवाजे बंद असल्याने अनेकांना निराश होऊन परत जावे लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Saswad Public Gardens
Cannabis Addiction Among Youth: पुण्यात तरुणांमध्ये गांजाच्या व्यसनाचे वाढते संकट; व्यसनमुक्ती केंद्रे ठरताहेत आशेचा किरण

शहरातील वाढती लोकसंख्या आणि खुल्या जागांची घटती उपलब्धता लक्षात घेता उद्यानांचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे बंद असलेल्या उद्यानांची तातडीने दुरुस्ती करून ती नागरिकांसाठी खुली करावीत, अशी मागणी जोर धरत आहे. सध्या मुलांना खेळण्यासाठी आणि कुटुंबीयांना विरंगुळ्यासाठी वाघ डोंगर परिसरातील वन विभागाच्या उद्यानाचा आधार घ्यावा लागत आहे.

Saswad Public Gardens
Pune Superstition Case: प्रार्थनेतून कॅन्सर बरा करण्याचा दावा; पास्टर केनेथ सिल्वे यांच्यासह अन्यांविरुद्ध गुन्हा

मात्र, शहरातील सर्व भागांतील नागरिकांसाठी हा पर्याय सोयीचा ठरत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने आवश्यक निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून बंद उद्याने लवकर सुरू करावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. सार्वजनिक उद्याने ही केवळ मनोरंजनाची ठिकाणे नसून सामाजिक संवाद, आरोग्यसंवर्धन आणि पर्यावरणसंतुलनाची केंद्र आहेत. त्यामुळे शहरातील सर्व उद्याने सुस्थितीत व कार्यरत ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, बंद पडलेल्या उद्यानांच्या पुनरुज्जीवनाकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news