Shivajinagar Court Premises: शिवाजीनगर न्यायालय परिसराची दुरवस्था; वाढलेले गवत, तुंबलेले ड्रेनेज, चिखल अन् कचऱ्याचे साम्राज्य

न्यायाच्या मंदिरालाच दुर्लक्षाची झळ; वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना दुर्गंधीयुक्त सांडपाण्यातून करावा लागतो प्रवास
Shivajinagar Court Premises
Shivajinagar Court PremisesPudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसराची अवस्था दिवसेंदिवस बकाल होत चालली असून, न्यायाच्या मंदिरालाच आता दुर्लक्षाची झळ बसल्याचे चित्र आहे. एकेकाळी हिरवागार, स्वच्छ आणि देखणा म्हणून ओळखला जाणारा हा परिसर सध्या वाढलेल्या गवताने, तुंबलेल्या ड्रेनेजने, साचलेल्या चिखलाने, कुजणाऱ्या कचऱ्याने आणि बांधकामांच्या राडारोड्याने विद्रूप झाला आहे. शेकडो वकील, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार आणि नागरिक दररोज या परिस्थितीचा सामना करत आहेत.

Shivajinagar Court Premises
Sugar Price: साखरेचे दर ५२ रुपयांवर; शेतकऱ्यांना प्रतिटन ३०० रुपये द्यावेत, राजू शेट्टींची मागणी

न्यायालयाच्या मुख्य इमारतीसमोरील हिरवळ कोमेजली आहे, तर काही ठिकाणी गवत इतके वाढले आहे, की नागरिकांना तेथे बसणेही शक्य होत नाही. तसेच अनावश्यक ठिकाणीही झुडपांचे साम्राज्य वाढले आहे. झाडे, वेली आणि हिरवळीची नियमित देखभाल बंद पडल्याने न्यायालयाचा निसर्गरम्य चेहराच हरवला आहे. पावसामुळे वाहून आलेली माती आणि चिखल रस्त्यांवर साचल्याने परिसर निसरडा बनला आहे.

Shivajinagar Court Premises
Teacher Personal Approval: शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेला आता १५ दिवसांची मुदत; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

अनेक ठिकाणी घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नवीन इमारतीसमोरील लिफ्टचे काम अर्धवट अवस्थेत असून, कामानंतरचा राडारोडा तसाच पडून आहे. ड्रेनेजची स्वच्छता वेळेवर होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. वकील आणि पक्षकारांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून न्यायालयात जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पालापाचोळा, खरकटे अन्न आणि इतर कचरा साचून कुजत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. ओला आणि सुका कचरा व्यवस्थापनासाठी ठेवलेल्या कचरापेट्याही निष्क्रिय अवस्थेत पडून आहेत.

Shivajinagar Court Premises
Lohegaon Airport Bird Hit: लोहगाव विमानतळाभोवती कचऱ्याचे ढीग; २० प्रकारच्या पक्ष्यांमुळे ‘बर्ड हिट’चा धोका वाढला

न्यायालय म्हणजे केवळ इमारत नसून न्यायव्यवस्थेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. न्याय मागण्यासाठी येणाऱ्या नागरिकावर न्यायालयाच्या परिसराची पहिली छाप पडते. परिसरात अस्वच्छता, वाढलेले गवत, साचलेले पाणी आणि अपूर्ण कामे दिसत असतील, तर त्यातून प्रशासनाबाबत चुकीचा संदेश जातो. न्यायालय प्रशासनाने नियमित देखभाल, बागांचे संवर्धन आणि स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारून या परिसराचे हरवलेले वैभव पुन्हा मिळवून द्यावे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला दोनदा अर्ज देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

ॲड. राकेश सोनार.

Shivajinagar Court Premises
Pune Municipal Schools Privatization: पुणे महापालिकेच्या आणखी ८ शाळा खासगी संस्थेला; विद्यार्थ्यामागे २९ हजारांचा खर्च

न्यायालयातील स्वच्छता आणि सुरक्षितता ही केवळ सौंदर्याची बाब नाही, तर न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित आहे. पावसाळ्यात चिखल, सांडपाणी आणि राडारोड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित विभागांनी एकत्रित कृती आराखडा तयार करून न्यायालय परिसर पुन्हा स्वच्छ, सुरक्षित आणि हिरवागार करावा.

ॲड. अमेय बलकवडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news