Pune Municipal Schools Privatization: पुणे महापालिकेच्या आणखी ८ शाळा खासगी संस्थेला; विद्यार्थ्यामागे २९ हजारांचा खर्च

पीपीपी तत्त्वावरील प्रक्रिया अंतिम टप्प्यात; पुढील ९ वर्षांसाठी महापालिका स्वीकारणार आर्थिक दायित्व
School
SchoolPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या पाच शाळां खासगी संस्थेला चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अवघ्या दिड दोन महिन्यातच आणखी आठ माध्यमिक शाळांही खासगी संस्थेला चालविण्यास देण्यात येणार आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या शाळा चालविण्यास देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यामागे वार्षिक २९ हजार रुपये खर्च करण्यासह पुढील नऊ वर्षांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

School
Junnar Firing: जुन्नरमध्ये गाणी लावण्यावरून वाद; तुळजाभवानी कला केंद्रात गोळीबार, तरुण जखमी

आकांक्षा फाउंडेशन या संस्थेला पाच शाळा नऊ वर्ष कालावधीसाठी चालविण्यास देण्याचा प्रस्ताव जुन महिन्यात मंजुर करण्यात आला. महापालिकेच्या शाळांच्या खासगीकरणाचा हा डाव असल्याने त्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले होते. असे असताना आता आणखी आठ माध्यमिक शाळा 'आयटीच मुव्हमेंट' या संस्थेकडे चालविण्यास देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला आहे. या आठही शाळांचे संचालन सध्या 'आयटीच मुव्हमेंट' या संस्थेकडून पीपीपी तत्त्वावर केले जात आहे. या शाळांमध्ये सध्या २ हजार २९३ विद्यार्थी शिक्षण घेत असून, चालू शैक्षणिक वर्षात ही संख्या सुमारे २ हजार ५०० पर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

School
Pavana Closed Pipeline: पवना बंदिस्त पाइपलाइनला शेतकऱ्यांचा विरोध; २ ऑक्टोबरला लाँगमार्च, जलसमाधीचा राजू शेट्टींचा इशारा

शाळांच्या इमारती महापालिकेच्याच ताब्यात राहणार असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश व इतर सुविधा डीबीटीद्वारे महापालिकेकडूनच दिल्या जात आहेत. आतापर्यंत शिक्षकांचे वेतन, कर्मचारीवर्गाचा खर्च आणि मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी संस्थेला सीएसआर निधीचा आधार होता. १४ कोटी रुपयांचा हा निधी २०२६-२७ पासून उपलब्ध होणार नसल्याने संस्थेने आर्थिक सहाय्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला होता. या मागणीला आयुक्तांनी तत्त्वतः मंजुरी दिल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू झाली आहे.

School
Pune Road Repair Tender: पुण्यातील ७५ कोटींच्या रस्ते दुरुस्ती निविदांना वादाचे ग्रहण; ठेकेदार पात्रतेवर प्रश्नचिन्ह

या शाळांसाठी नऊ वर्षांच्या कालावधीचा करार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यामध्ये ‘आयटीच मुव्हमेंट’ हीच संस्था पात्र ठरली. सुरुवातीला संस्थेने प्रति विद्यार्थी ३३ हजार रुपयांचा दर मागितला होता. त्यानुसार २७७३ विद्यार्थ्यांसाठी वार्षिक ९.१५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, शिक्षण विभागाशी झालेल्या चर्चेनंतर हा दर कमी करून २९ हजार रुपये निश्चित करण्यात आला. भविष्यात महागाई निर्देशांकानुसार या दरात वाढ करण्याची तरतूदही प्रस्तावात करण्यात आली आहे. या खर्चासाठी महापालिकेने अंदाजपत्रकातील कलम ७२(ब) अंतर्गत पुढील नऊ वर्षे आर्थिक दायित्व स्वीकारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

School
Pune Road Potholes: पुणेकरांना खड्ड्यांतूनच प्रवास; महापालिकेचा ‘खड्डेमुक्त रस्त्यां’चा दावा फेल?

या शाळांचा समावेश

  • क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे शाळा, येरवडा

  • संत गाडगे महाराज इंग्रजी माध्यम शाळा, कोंढवा

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी शाळा, औंध

  • स्व. विठ्ठलराव तुपे शाळा, हडपसर

  • राजर्षी शाहू महाराज शाळा, मुंढवा

  • पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा, कोथरूड

  • आचार्य विनोबा भावे शाळा, गंजपेठ

  • सम्राट अशोक विद्यामंदिर, कर्वेनगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news