Shirwali Liquor Seizure: शिरवलीत ७ लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त; दोघांना अटक

बारामती उत्पादन शुल्क विभागाची निवडणूकपूर्व धडाकेबाज कारवाई; वाहनासह २० बॉक्स दारू जप्त
Liquor
LiquorPudhari
Published on
Updated on

बारामती: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत मद्य वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. या कारवाईत 6 लाख 97 हजार रुपये किमतीचा विदेशी दारूसाठा आणि एक चारचाकी वाहन जप्त करून दोघांना अटक करण्यात आले.

Liquor
Pandare Village Development: पणदरे… गाव तसं चांगलं; पण राजकीय कुरघोडीत विकास ठप्प

अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. रामसिंह मोहबतसिंह राजपूत आणि महिपालसिंह राजसिंह राजपूत अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

Liquor
Nira Dam Water Storage: निरा खोऱ्यात धरणसाखळीत तब्बल 97.71 टक्के साठा

बारामती तालुक्यातील शिरवलीच्या हद्दीत सांगवी-बारामती रस्त्यावरील माळेगाव फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. एमएच 01 बीएफ 8165 या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यात मध्य प्रदेशात विक्रीस परवानगी असलेली, मात्र महाराष्ट्रात प्रतिबंधित मद्याचा मोठा साठा आढळून आला.

Liquor
Rural Unemployment Marriage Issues: बेरोजगारीची बेडी; ग्रामीण तरुणांचे विवाहअडथळे वाढले

एकूण 20 बॉक्स व वाहन जप्त करण्यात आले, तर वाहनातील रामसिंह व महिपालसिंह राजपूत या दोघांना अटक करण्यात आली.

Liquor
Women Lawyers Reservation Bar Council: महिला वकिलांसाठी ३० टक्के आरक्षणाची मागणी पुन्हा चर्चेत

या कारवाईत निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक सागर साबळे, मनोज होलम, गिरीशकुमार कर्चे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश जाधव, तसेच जवान निखिल देवडे, सुरेश खरात, सागर दुबळे आणि टी. एस. काळे सहभागी होते. गिरीशकुमार कर्चे हे पुढील तपास करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news