Pandare Village Development: पणदरे… गाव तसं चांगलं; पण राजकीय कुरघोडीत विकास ठप्प

मूलभूत सुविधांची मोठी कमतरता; सत्ताधारी–विरोधक संघर्षामुळे गावाचा विकास दहा वर्षांपासून अडखळला
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

प्रा. अनिल धुमाळ

शिवनगर: बारामती तालुक्यातील पणदरे गाव तालुक्याच्या राजकीय पटलावरील अत्यंत प्रभावी असणारे गाव आहे. या गावाला ऐतिहासिक वारसा आहे. सामाजिक आणि राजकीय समतोल असणाऱ्या या गावात मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा गावाच्या विकासावर परिणाम झाला आहे. ग््राामस्थांच्या मूलभूत गरजांकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्यामुळे ग््राामस्थांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे पणदरे... गाव तसं चांगलं पण...! असे म्हणावे लागत आहे.

Pune Municipal Corporation
Nira Dam Water Storage: निरा खोऱ्यात धरणसाखळीत तब्बल 97.71 टक्के साठा

बारामती तालुक्याच्या बागायती पट्‌‍ट्यातील अत्यंत प्रभावी समजल्या जाणाऱ्या पणदरे गावाच्या विकासाला मागील दहा वर्षांतील गटातटाच्या राजकारणामुळे खीळ बसली आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी, दिवाबत्ती, रस्ते आणि आरोग्य यासाठी गावकऱ्यांना सातत्याने झगडावे लागत आहे.

Pune Municipal Corporation
Rural Unemployment Marriage Issues: बेरोजगारीची बेडी; ग्रामीण तरुणांचे विवाहअडथळे वाढले

बहुतांश ग््राामपंचायतीमध्ये एकदा का निवडणूक झाली की, झाले गेले गंगेला मिळाले या हिशेबाने सत्ताधारी तसेच विरोधक एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी कामकाज करताना दिसून येते. मात्र, पणदरे गावात तसे झालेले नाही. पणदरे ग््राामपंचायतीत सत्ताधारी आणि विरोधक कायम एकमेकांना पाण्यात बघताना दिसतात. त्यामुळे राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून गावाच्या विकासकामांसाठी येणारा निधी वापरताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कायमच रस्सीखेच असते. परिणामी निधी पडून राहण्याची शक्यता आहे. निधी न वापरल्यास तो परत जाण्याची शक्यता असते. एकूणच सत्ताधारी आणि विरोधक यांच्या कुरघोडीच्या राजकारणात गावाचा विकास थांबला आहे, हे मात्र नक्की!

Pune Municipal Corporation
Women Lawyers Reservation Bar Council: महिला वकिलांसाठी ३० टक्के आरक्षणाची मागणी पुन्हा चर्चेत

ज्येष्ठांनी लक्ष घालावे

पणदरे ग््राामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास होण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूच्या ज्येष्ठ नेते मंडळीनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी तसेच ग््राामस्थांना त्यांच्या हक्काच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

निधीचा वापर सहमतीने करावा

सरपंचासह सर्व सदस्यांनी एकत्र येत शासनाकडून येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी गावाच्या विकासासाठी सर्व सहमतीने वापरणे गरजेचे आहे. ग््राामस्थांनी आपल्याला निवडणुकीत त्यांचे प्रतिनिधी म्हणून पाठवले आहे याचे भान ठेवून गावाच्या नावलौकिकाला कोठेही तडा जाणार नाही असे कामकाज करणे गरजेचे आहे, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.

Pune Municipal Corporation
Ban Muslim Polygamy India: मुस्लिम समाजातील ‘बहुपत्नीत्व’वर कायदेशीर बंदीची जोरदार मागणी

ग््राामसभेत आवाज उठवावा

आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तथा ग््राामपंचायत सदस्य हे आपल्या वॉर्डात चांगले कामकाज करत आहेत का? गावाच्या भल्यासाठी झटत आहेत का? पारदर्शक तसेच भष्टाचारमुक्त कामकाज करत आहेत का? यासाठी गावातील तरुणांसह ग््राामस्थांनी पुढाकार घेण्याची गरज असून याबाबत ग््राामसभेमध्ये आवाज उठवणे गरजेचे आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निधी आणावा

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणून ग््राामस्थांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. अजित पवारांशी सख्य असणाऱ्या गावातील ज्येष्ठ नेत्यांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news