Shirur Shooting Video: शिरूरमध्ये खळबळ! साडेसहा वाजता अचानक गोळीबाराचा आवाज; बाहेर येऊन पाहिलं तर तरुण रक्ताच्या थारोळ्यात

Shirur Shooting Video: शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता गोळीबाराची घटना घडली.
Shirur Shooting Video
Shirur Shooting VideoPudhari
Published on
Updated on

Shirur Shooting Video: पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली. लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरी गंगावणे या तरुणाचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजताच्या आसपास परिसरात गोळीबाराचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने नागरिकांनी धाव घेतली असता हरी गंगावणे गंभीर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. गोळ्या लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Shirur Shooting Video
Abhishek Sharma: 96 विरुद्ध 86! अभिषेक शर्माने वैभव सूर्यवंशीला टाकलं मागे; 30 चेंडूत शतक ठोकून रचला इतिहास

घटनास्थळी पोलिसांसह फॉरेन्सिक पथकाची पाहणी

गोळीबाराची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील पुरावे तपासले.

तपासादरम्यान घटनास्थळावर काही रिकामी काडतुसे पोलिसांच्या हाती लागली असून ती जप्त करण्यात आली आहेत. हल्लेखोरांनी नेमक्या कोणत्या कारणातून तरुणावर गोळीबार केला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

Shirur Shooting Video
Delhi Crime News: कंपनीच्या माजी सहकाऱ्याला भेटायला गेला अन् परतलाच नाही; कारमध्ये 7 तास मृतदेह, पुढे जे घडलं ते धक्कादायक

हल्ल्यामागे नेमकं कारण काय?

हा हल्ला जुन्या वादातून किंवा वैमनस्यातून झाला आहे का, यासह इतर शक्यतांचाही पोलीस तपास करत आहेत. हल्लेखोरांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून, पहाटेच्या वेळी शहरात झालेल्या गोळीबारामुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, हरी गंगावणे यांच्या हत्येमागील नेमकं कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news