Shirur Crime: शिरूरमध्ये चुकीच्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या; सुपारी हत्येचा उलगडा

विकास नवले यांच्या हत्येची दिली होती सुपारी; मारेकऱ्यांनी कामगार हामजा शेख यांनाच नवले समजून संपवले, पाच आरोपी अटकेत
Shirur Hamza Sheikh Murder
Shirur Hamza Sheikh MurderPudhari
Published on: 
Updated on: 

शिरूर: कारेगाव (ता.शिरूर)येथील साईनगर परिसरातील पाण्याच्या प्लॅन्टमध्ये काम करणाऱ्या हामजा उस्मान शेख (वय ३९) यांच्या गोळीबारातील हत्येचा रांजणगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. जागेच्या वादातून विकास नवले यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती; मात्र मारेकऱ्यांनी विकास नवले समजून त्यांचा कामगार हामजा शेख यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Shirur Hamza Sheikh Murder
Walhe Bamboo Paradi: घटस्थापनेपूर्वी वाल्ह्यातील बांबूच्या परड्यांना मागणी; हजारो परड्या पुण्याकडे रवाना

या प्रकरणी पोलिसांनी सार्थक संदेश कोहकडे (२४, कारेगाव), तुषार अजय तोडकर (२६, पेठ, आंबेगाव), संतोष मधुकर मांजरे (३७, मांजरेवस्ती, खेड), विठ्ठल नवनाथ पिकळे (२७, कोरेगाव, खेड) आणि योगेश विलास इडोळे (२८, शुक्रवार पेठ, वाशीम) या पाच जणांना अटक केली आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. तर पवन सुरेश हुंडारे आणि पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव या दोघांचा शोध सुरू आहे. रांजणगाव पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४६३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) व शस्त्र अधिनियम कलम ३(२५) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shirur Hamza Sheikh Murder
Baramati Crime: तमाशा, जुगाराच्या नादातून कर्जबाजारी; बारामतीतील दुहेरी खूनप्रकरणी आरोपी अटकेत

जागेच्या वादातून हत्येची सुपारी

पोलिस तपासानुसार, सार्थक कोहकडे याचा शेजारी राहणाऱ्या विकास नवले यांच्याशी जागेवरून वाद होता. या वादातून सार्थकने विकास नवले यांचा काटा काढण्यासाठी तुषार तोडकर याला सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. तुषारने पुढे पिंपरी-चिंचवड परिसरातील सराईत तडीपार गुन्हेगार संतोष मांजरे याच्याशी संपर्क साधून हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर संतोष मांजरे याने पवन हुंडारे, पृथ्वी जाधव, विठ्ठल पिकळे व योगेश इडोळे यांच्या साथीने हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

Shirur Hamza Sheikh Murder
Mutha Canal Debris Dumping: वडगाव बुद्रुकमध्ये मुठा कालव्यालगत राडारोड्याचे ढिग; कालव्याच्या सुरक्षेला धोका

२९ सप्टेंबर रोजी हामजा शेख हे नेहमीप्रमाणे कारेगाव साईनगर येथील ‘ समु इंटरप्रायजेस अ‍ॅक्वा रिच’ या पाण्याच्या प्लॅन्टमध्ये कामावर गेले होते. याच ठिकाणी मारेकऱ्यांनी विकास नवले यांना लक्ष्य करून गोळीबार केल्याचे पोलिस तपासात समोर आले. मात्र विकास नवले यांच्या ऐवजी त्यांचा कामगार हामजा शेख यालाच नवले असल्याचे समजून आरोपींनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ तसेच घटनास्थळाकडे ये-जा करणाऱ्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत हत्येच्या कटाचा उलगडा झाला.

Shirur Hamza Sheikh Murder
Wagholi Police Chowkis: वाघोलीत तीन नवीन पोलिस चौक्या प्रस्तावित; नागरिकांना प्रतीक्षा कायम

दोघांचा शोध सुरू

हत्येच्या कटात सहभागी असल्याचे निष्पन्न झालेल्या पवन सुरेश हुंडारे व पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही बाबींचा तपास सुरू असून, आरोपींच्या चौकशीतून हत्याकांडामागील संपूर्ण साखळी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, अनिल मोरडे, पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, निळकंठ तिडके, अविनाश थोरात, दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने केली.

या कारवाईत पोलीस अंमलदार शरद बांबळे, संजय पड्याळ, दीपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील, सागर धुमाळ, संदीप फड, स्वप्नील गाढवे, हनुमंत ढोबळे, संदीप वारे, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, अतुल डेरे, चेतन पाटील, भारत मोहोळ, विलास आंबेकर, उमेश कुतवळ, योगेश गुंड, रासकर, शिवणकर, संतोष साळुंखे, दत्तात्रय शिंदे तसेच खेड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संकेत कवडे यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कुमार कदम करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news