Wagholi Police Chowkis: वाघोलीत तीन नवीन पोलिस चौक्या प्रस्तावित; नागरिकांना प्रतीक्षा कायम

गावठाण, बायफ रोड आणि बकोरी फाटा येथे चौक्या उभारण्याचा प्रस्ताव; वाघोली-भावडी रोडवरील काम सुरू
Police Station
Police Station Pudhari
Published on: 
Updated on: 

वाघोली: वाढती गुन्हेगारी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी नवीन पोलिस चौक्या स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली होती. मात्र, अद्याप नवीन पोलिस चौक्या कार्यान्वित झाल्या नाहीत. या चौक्या सुरू होणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Police Station
Gadgil Committee Report: पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी गाडगीळ समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा

वाघोली गाव यापूर्वी लोणीकंद ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत होते. त्या काळात वाघोली येथे लोणीकंद पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिस चौकी कार्यरत होती. मात्र, वाघोली गावाचा पुणे महापालिकेत समावेश झाले. वाघोलीतील येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. वाढते नागरीकरण आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेता गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने येथे स्वतंत्र वाघोली पोलिस ठाण्याची स्थापना करण्यात आली.

Police Station
Kurash Fake Certificates: कुराशच्या बोगस प्रमाणपत्रांचा पर्दाफाश; १२ वर्षांच्या मुलीने २३ वर्षीय ‘खेळाडू’ला काही सेकंदांत हरवले

दरम्यान, परिसराचा वाढता विस्तार आणि नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी गायकवाड यांनी वाघोलीतील महत्त्वाच्या ठिकाणी तीन नवीन पोलिस चौक्या स्थापन करण्याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावामध्ये प्रत्येक चौकीमध्ये एक सहायक पोलिस निरीक्षक, एक उपपोलीस निरीक्षक, दोन पोलिस हवालदार आणि दोन पोलिस अंमलदार, अशी मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार होती. त्यामुळे नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी थेट वाघोली पोलिस ठाण्यात जाण्याची गरज भासणार नाही.

Police Station
Pune MPSC Students Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन; ५१ विद्यार्थ्यांना नोटिसा

वाघोली गावठाण, बायफ रोड तसेच बीजेएस महाविद्यालयाजवळील बकोरी फाटा या तीन ठिकाणी पोलिस चौक्या उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या चौक्यांसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी जागेची पाहणी करून संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामुळे या चौक्यांचे बांधकाम होऊन त्या कार्यान्वित कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Police Station
Ujani Dam Fishing Contract: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द

वाघोली-भावडी रोडवरील चौकीचे बांधकाम सध्या सुरू आहे. अन्य चौकांचे कामही लवकर सुरू होईल. त्यानंतर या चौक्यांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.

नंदकुमार गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाघोली पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news