Baramati Crime: तमाशा, जुगाराच्या नादातून कर्जबाजारी; बारामतीतील दुहेरी खूनप्रकरणी आरोपी अटकेत

कर्जफेडीसाठी सोन्याच्या दागिन्यांची चोरी करण्याचा डाव; पाच तोळे सोन्याचे दागिने जप्त
Baramati Murder accused arrested
Baramati Murder accused arrestedPudhari
Published on: 
Updated on: 

बारामती: बारामती तालुक्यातील सुपे पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाबुर्डी- शेरेवाडी येथे घडलेले दुहेरी खून प्रकरण हे तमाशाचा अन् जुगाराचा नाद आणि त्यातून झालेल्या कर्जबाजारीपणातून झाल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकास ऊर्फ अप्पा राजेंद्र लडकत (वय २५) याला अटक केली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी बारामतीत पत्रकार परिषदेत दिली.

Baramati Murder accused arrested
Mutha Canal Debris Dumping: वडगाव बुद्रुकमध्ये मुठा कालव्यालगत राडारोड्याचे ढिग; कालव्याच्या सुरक्षेला धोका

या पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, परीविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक मनीषा ओमासे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, सुप्याचे शशिकांत शेळके आदी उपस्थित होते. शेरेवाडीच्या या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला विकास हा मृत महिलांपैकी एकीचा तो चुलत नातू, तर दुसरीचा चुलत पुतण्या आहे.

Baramati Murder accused arrested
Wagholi Police Chowkis: वाघोलीत तीन नवीन पोलिस चौक्या प्रस्तावित; नागरिकांना प्रतीक्षा कायम

याबाबत अधिक माहिती देताना गिल्ल म्हणाले, तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला गेला. त्यातून विकास याचे नाव पुढे आले. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने कर्जबाजारीपणातून हे खून केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले सुमारे ६ लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Baramati Murder accused arrested
Gadgil Committee Report: पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी गाडगीळ समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा

२९ सप्टेंबर रोजी शेरेवाडीत घराबाहेरील ओट्यावर झोपलेल्या इंदुमती मारुती लडकत (वय ७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ५५) यांचा खून झाला होता. सोन्याच्या दागिन्यांसाठीच दोन्ही महिलांची हत्या केल्याचे विकास याने सांगितले आहे. त्याला तमाशा, जुगाराचे व्यसन आहे. त्यातून तो कर्जबाजारी झाला होता. कर्जफेड करण्यासाठी दागिने चोरण्याचा त्याचा डाव होता, असे तपासात पुढे आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news