वाल्हेकरवाडी महापालिका शाळेच्या मैदानात बसशेड

वाल्हेकरवाडी महापालिका शाळेच्या मैदानात बसशेड

पिंपरी(पुणे) : गेली चार ते पाच महिन्यांपासून रस्त्यावरील बसशेड काढून पिंपरी चिंचवड महापलिकेच्या वाल्हेकरवाडी शाळेच्या मैदानात टाकण्यात आले आहे. शहरात काही ठिकाणी प्रवासी उन्हा-पावसात बसशेड नसल्याने रस्त्यावर उभे आहेत. तर काही ठिकाणी बसशेड अशा प्रकारे उखडून टाकण्यात आले आहेत.

त्यामुळे प्रवाशांची गैरसोय तर होतच आहे; पण विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका संभवतो. चिंतामणी चौकातील मनपा शाळा सुरू झाल्यापासून हे बसशेड याठिकाणी तसेच पडून आहे. बसशेडची मोडतोड झाली असल्याने पुन्हा हे शेड वापरात येणार नाही. मात्र, त्याची विल्हेवाट लावण्याऐवजी मैदानात ठेवण्यात आहे. या मोडक्या बसशेडमुळे विद्यार्थ्यांना खेळताना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news