Pune Sex Workers Digital Literacy: पुण्यात देहविक्रय करणाऱ्या महिलांचे डिजिटल सशक्तीकरण; आयुष्यात नवा आत्मविश्वास

स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारामुळे सोशल मीडिया, ऑनलाइन व्यवहार आणि शासकीय योजनांचा वापर करून महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल
Digital Literacy
Digital LiteracyPudhari
Published on
Updated on

पुणे: अल्पशिक्षित असल्याने अन् आयुष्यातील कठीण परिस्थितीमुळे देहविक्रयाच्या खाईत लोटलेल्या महिला सोशल मीडियाच्या झगमगीत दुनियेपासून दूर होत्या. पण, समाज सुधारणेच्या कामात झोकून दिलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे आता देहविक्रय करणाऱ्या महिला डिजिटल साक्षर बनल्या आहेत. यामुळे महिलांच्या आयुष्यात आता आशेचा नवा किरण आणि आनंद निर्माण झाला आहे.

Digital Literacy
Pune Foreign Currency Robbery Arrest: पेपर स्प्रे हल्ला करून २५ लाखांची लूट; सहकारनगर पोलिसांची मोठी कारवाई

समाजापासून अलिप्त राहणाऱ्या या महिला आता आपल्या मुलांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत आहेत, त्यांच्या शिक्षणाची आणि प्रगतीची माहिती घेत आहेत. बँकेतील व्यवहार ऑनलाइन करण्यापासून ते शासकीय योजनांची माहिती मिळविण्यापर्यंत अनेक गोष्टी त्या स्वतः करू लागल्या आहेत. काहींनी तर सायबर फसवणुकीवर आवाजही उठवला आहे. सोशल मीडियाचा वापर करत त्या स्वतःच्या आयुष्यात नवा बदल घडवून आणत आहेत.

Digital Literacy
Deccan Queen Birthday: ‘डेक्कन क्वीन’चा 97 वा वाढदिवस जल्लोषात; पुणे स्थानकावर फुलांनी सजवून अनोखा उत्सव

मंगळवारी (दि. 2 जून) साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर्स डेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढाव्यात डिजिटल साक्षरतेमुळे महिलांच्या जीवनात आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची नवी ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसून आले. विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे या महिलांना सोशल मीडिया वापरण्याचे प्रशिक्षण मिळाले आहे. डिजिटल पेमेंट, ऑनलाइन बँकिंग, शासकीय योजनांसाठी अर्ज, व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडियाचा वापर या गोष्टी आता त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत.

Digital Literacy
Pune Airport Passenger Crowd: पुणे विमानतळावर मे महिन्यात विक्रमी गर्दी; 10 लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास, आंतरराष्ट्रीय वाहतुकीत मात्र मोठी घट

महत्त्वाचे म्हणजे, सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचेही प्रशिक्षण महिलांना दिले जात आहे. महिला आता डिजिटल जगाशी जोडल्या गेल्या आहेत. बुधवार पेठेतील वस्तीमध्ये अनेक महिलांनी स्वतःचे व्हॉट्‌‍सॲप गट तयार केले आहेत. या गटांद्वारे त्या एकमेकींच्या सुख- दुःखात सहभागी होत आहेत, समस्या मांडत आहेत आणि आरोग्य, शिक्षण, शासकीय योजना, तसेच विविध हक्कांबाबतची माहिती एकमेकींपर्यंत पोहोचवत आहेत. काही महिला फेसबुक, इन्स्टाग््राामसारख्या माध्यमांचाही प्रभावी वापर करू लागल्या आहेत.

Digital Literacy
Pimpri SRA Scam: विठ्ठलनगर-नेहरूनगर एसआरएत 1,075 कोटींच्या टीडीआर घोटाळ्याचा आरोप; 1,240 बीएसयूपी लाभार्थी पुन्हा घुसविल्याचा दावा

महिलांना डिजिटल साक्षर करण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यशाळा आयोजित करीत आहोत. सोशल मीडिया सुरक्षितपणे वापरणे, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आणि सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले जात आहे. या प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये केवळ तांत्रिक कौशल्येच विकसित झालेली नाहीत, तर त्यांचा आत्मविश्वासही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

तेजस्वी सेवेकरी, सहेली संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news