Deccan Queen Birthday: ‘डेक्कन क्वीन’चा 97 वा वाढदिवस जल्लोषात; पुणे स्थानकावर फुलांनी सजवून अनोखा उत्सव

पुणे-मुंबईच्या लाडक्या रेल्वेचे जंगी स्वागत; केक कापून आणि बँडच्या सलामीने वाढदिवस साजरा
Deccan Queen
Deccan QueenPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे-मुंबईला जोडणारी आणि चाकरमान्यांची लाडकी असलेल्या ‌‘डेक्कन क्वीन‌’ रेल्वेचा पुणे रेल्वेस्थानकावर 97 वा वाढदिवस सोमवारी (दि. 1 जून) सकाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या या गाडीचे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जंगी स्वागत करण्यात आले. वाजतगाजत, फुलांनी सजून वाढदिवस साजरा झाल्यावर या रेल्वेने चाकरमान्यांना घेऊन मुंबईकडे प्रस्थान केले.

Deccan Queen
Pune Airport Passenger Crowd: पुणे विमानतळावर मे महिन्यात विक्रमी गर्दी; 10 लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास, आंतरराष्ट्रीय वाहतुकीत मात्र मोठी घट

रेल्वे प्रवासी ग््रुापच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. या वेळी कोहिनूर ग््रुापचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंत कुमार बेहेरा व अन्य मान्यवर उपस्थित होते. केक कापल्यानंतर गाडी मुंबईच्या दिशेने सकाळी सव्वासातच्या सुमारास रवाना झाली. वाढदिवसादरम्यान बँड पथकाने बँड वाजवून सलामी दिली. या वेळी रेल्वेच्या चालकांचा सत्कार करून त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेण्यात आली.

Deccan Queen
Pimpri SRA Scam: विठ्ठलनगर-नेहरूनगर एसआरएत 1,075 कोटींच्या टीडीआर घोटाळ्याचा आरोप; 1,240 बीएसयूपी लाभार्थी पुन्हा घुसविल्याचा दावा

बर्थडे साजरा होणारी जगातील एकमेव ट्रेन

या वेळी हर्षा शहा म्हणाल्या, ‌‘दी ग््रेाट इंडिया पेनिनसुलर रेल्वे‌’ यांनी दि. 1 जून 1930 रोजी ‌’पुणे-मुंबई-पुणे‌’ या मार्गावर इलेक्ट्रिक, हायस्पीड, कम्फर्ट, लक्झरी, डिलक्स सुविधांनी परिपूर्ण अशी ‌‘डेक्कन क्वीन‌’ ही रेल्वेगाडी सुरू केली. सुरुवातीला ‌‘ब्लू बर्ड बेबी‌’ म्हणून ओळखली जाणारी ही रेल्वे ‌‘दख्खनची राणी‌’ म्हणजेच ‌’डेक्कन क्वीन‌’ नावाने ओळखली जाऊ लागली. आता मध्य रेल्वेअंतर्गत ती सुरू आहे. ही जगातील एकमेव ट्रेन आहे, जिचा वाढदिवस साजरा होत असतो. गेल्या 72 वर्षांपासून म्हणजेच अगदी मी पाच वर्षांची असल्यापासून वाढदिवस साजरा करते, याचा मला खूप आनंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news