Pune Airport Passenger Crowd: पुणे विमानतळावर मे महिन्यात विक्रमी गर्दी; 10 लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास, आंतरराष्ट्रीय वाहतुकीत मात्र मोठी घट

उन्हाळी सुट्यांमुळे देशांतर्गत प्रवाशांची संख्या उच्चांकावर; आखाती हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासाला फटका
Plane
PlanePudhari
Published on
Updated on

पुणे: उन्हाळी सुट्या आणि पर्यटनाचा हंगाम यामुळे मे 2026 या महिन्यात पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. मे 2026 या एकाच महिन्यात देशांतर्गत तब्बल 10 लाख 29 हजार 594 प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला असून, चालू वर्षातील हा सर्वोच्च आकडा ठरला आहे. मात्र, अमेरिका-इराण- इस्रायल युद्धामुळे आखाती देशातील एअर स्पेस बंद आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासात काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले.

Plane
Pimpri SRA Scam: विठ्ठलनगर-नेहरूनगर एसआरएत 1,075 कोटींच्या टीडीआर घोटाळ्याचा आरोप; 1,240 बीएसयूपी लाभार्थी पुन्हा घुसविल्याचा दावा

विमानतळ प्रशासनाकडून फेबुवारी ते मे 2026 या चार महिन्यांची अधिकृत प्रवासी वाहतूक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या माहितीनुसार, मे महिन्यात पुणे विमानतळाने पहिल्यांदाच एकाच महिन्यात 10 लाखांचा टप्पा पार करत एकूण 10,29,594 प्रवाशांना सेवा दिली. एप्रिल महिन्याच्या तुलनेत (8.74 लाख प्रवासी) मे महिन्यात प्रवासी संख्येत तब्बल 19 टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे.

Plane
Edible Oil Prices: आखाती तणावाचा खाद्यतेल बाजारावर परिणाम; पुणेकरांना स्वस्त पर्यायांचा आधार घ्यावा लागू शकतो

फेबुवारी महिन्यात देशांतर्गत प्रवाशांची संख्या 8,76,010 एवढी होती, ती मार्चमध्ये 9,08,646 पर्यंत वाढली. एप्रिलमध्ये यात काहीशी घट होऊन हा आकडा 8,59,223 वर आला होता. मात्र, मे महिन्यात ‌‘समर व्हेकेशन‌’चा थेट परिणाम दिसून आला आणि देशांतर्गत प्रवाशांचा आकडा थेट 10 लाख 29 हजार 594 वर पोहोचला. पुणेकरांनी दिल्ली, बंगळुरू, गोवा, काश्मीर आणि सिमला यांसारख्या पर्यटनस्थळांना मोठी पसंती दिल्याचे चित्र आहे. नवीन टर्मिनलबद्ध सुविधांमुळे या गर्दीचे नियोजन करणे शक्य झाले.

Plane
Talegaon Railway Station: तळेगावमध्ये नवीन रेल्वे मालधक्का; पुणे औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना

आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या 64 टक्क्यांनी घटली...

एकीकडे देशांतर्गत प्रवासीसंख्या झपाट्याने वाढत असताना, आंतरराष्ट्रीय अमेरिका-इराण-इस्रायल यांच्या युद्धामुळे प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. फेबुवारी 2026 मध्ये 33,309 आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी पुण्याहून प्रवास केला होता.

Plane
MahaRERA Recovery: महारेराच्या वसुली प्रक्रियेला गती नाही; घर खरेदीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले

मार्चमध्ये हा आकडा थेट निम्म्यावर म्हणजेच 16,439 वर आला. एप्रिलमध्ये 15,723, तर मे महिन्यात केवळ 11,836 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची नोंद झाली. फेबुवारीच्या तुलनेत मे महिन्यातील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या तब्बल 64.46 टक्क्यांनी घटली आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक दिवस एअर स्पेस बंद असल्याने आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये घट झाल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news