SATHI Portal Seeds: शेतकऱ्यांसाठी मोठी डिजिटल सुविधा! बियाण्यांची गुणवत्ता आता ‘साथी’ पोर्टलवर तपासता येणार

क्यूआर कोडद्वारे बियाण्यांचा संपूर्ण इतिहास पाहता येणार; पारदर्शकतेसाठी केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल
SATHI Portal
SATHI PortalPudhari
Published on
Updated on

पुणे: शेतकऱ्यांना बनावट, कालबाह्य व अनधिकृत बियाण्यांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या सहकार्याने साथी पोर्टल विकसित केले आहे. साथी प्रणालीनिर्मित सांकेतांक क्रमांकामुळे (क्यूआर कोड) बियाण्यांच्या उत्पादनाचा स्वतंत्र इतिहास शेतकऱ्याला सहज तपासता येतो. शेतकऱ्यांसाठी ते बियाण्यांच्या पारदर्शकता, गुणवत्ता व विश्वासार्हतेकडे डिजिटल पाऊल म्हणून पाहिले जात असल्याचे कृषी आयुक्तालयातून कळविण्यात आले आहे.

SATHI Portal
Online Medicine Sale: ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशभरातील मेडिकल बंद; ‘AI’मुळे वाढला गैरवापराचा धोका

या पोर्टलची अंमलबजावणी सन 2023 पासून टप्प्याटप्प्याने करण्यात आली असून, दिनांक 25 एप्रिल 2025 पासून सत्य प्रत बियाणे ‌‘साथी‌’ पोर्टलवर उत्पादकांची नोंदणी, त्यांच्या उत्पादनांची माहिती व विक्री करण्याबाबत कार्यान्वित करण्यास शासनाने मान्यता दिल्याचे कृषी आयुक्तालयातून कळविण्यात आले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वेळेवर, गुणवत्तापूर्ण आणि खात्रीशीर बियाणे मिळण्यासाठी ‌’साथी‌’ पोर्टलद्वारे बियाण्यांच्या संपूर्ण प्रवासाची नोंद ठेवली जाते.

SATHI Portal
Ujani Migratory Birds: उजनीत ‘अग्निपंखी’ गायब! स्थलांतरित पक्ष्यांनी फिरवली पाठ; पर्यटनावर मोठा परिणाम

‘साथी‌’ प्रणालीनिर्मित सांकेतांक क्रमांकामुळे (क्यूआर कोड) बियाण्यांच्या उत्पादनाचा स्वतंत्र इतिहास शेतकऱ्याला सहज तपासता येतो. यामुळे ट्रेसिबिलिटी, पारदर्शकता, गुणवत्तानियंत्रण आणि कायदेशीर पालन सुनिश्चित होण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्हता वाढते.

SATHI Portal
Pune Eye Surgery Death: पुण्यात शस्त्रक्रियेनंतर 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; दीनानाथ रुग्णालयावर गंभीर आरोप

शेतकऱ्यांना बियाणे विक्री करण्यासाठी बियाणे विक्रेत्यांनी पोर्टलवर लॉगिन करावे. त्यावर आवश्यक ती माहिती भरून शेतकऱ्यांना बियाणे विक्री करताना फार्मर आयडी नमूद करावा. राज्यातील बियाणे उत्पादक तसेच विक्रेत्यांच्या संघटनांचे (सियाम, मासा व माफदा) सूचनांनुसार ‌‘साथी‌’ पोर्टलमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.

SATHI Portal
SBI Gold Loan Fraud: पुण्यात ‘बनावट सोन्याचा’ मोठा घोटाळा! SBI ला 4.23 कोटींचा गंडा

‌‘योग्य बियाणे, योग्य वेळी शेतकऱ्यापर्यंत‌’ देणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वय, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. त्याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देत पिकांची उत्पादनक्षमता वाढविणे शक्य होईल.

डॉ. प्रीती सवाईराम, कृषी उपसंचालक (बियाणे), कृषी आयुक्तालय, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news