Online Medicine Sale: ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशभरातील मेडिकल बंद; ‘AI’मुळे वाढला गैरवापराचा धोका

बनावट प्रिस्क्रिप्शनद्वारे घातक औषधांची विक्री होत असल्याचा औषध विक्रेत्यांचा गंभीर आरोप
Medicine
MedicinePudhari
Published on
Updated on

पुणे: केंद्र सरकारच्या धोरणांतील विसंगती आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे देशात विनापरवाना ऑनलाईन औषध विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असून, त्याविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी (दि. 20 मे) देशव्यापी संप पुकारला आहे. या दिवशी मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघटनांकडून देण्यात आली.

Medicine
Ujani Migratory Birds: उजनीत ‘अग्निपंखी’ गायब! स्थलांतरित पक्ष्यांनी फिरवली पाठ; पर्यटनावर मोठा परिणाम

औषध विक्रेत्यांच्या मते, अनेक ई-कॉमर्स कंपन्या नियमांचे उल्लंघन करून थेट घरपोच औषध वितरण करत आहेत. या प्रक्रियेत रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनची किंवा औषधांच्या योग्य वापराची पुरेशी पडताळणी होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Medicine
Pune Eye Surgery Death: पुण्यात शस्त्रक्रियेनंतर 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; दीनानाथ रुग्णालयावर गंभीर आरोप

विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने डॉक्टरांच्या बनावट चिठ्‌‍ठ्या तयार करून नशा आणणारी किंवा घातक औषधे मागवली जात असल्याचा गंभीर मुद्दाही समोर आला आहे. राष्ट्रीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की, एकीकडे अवैध ऑनलाईन औषध विक्रीला मोकळीक दिली जात आहे, तर दुसरीकडे पारंपरिक औषध विक्रेत्यांवर जाचक नियम लादले जात आहेत. जीएसआर 220 (ई) आणि जीएसआर 817 (ई) यांसारखे नियम तातडीने रद्द करावेत.

Medicine
SBI Gold Loan Fraud: पुण्यात ‘बनावट सोन्याचा’ मोठा घोटाळा! SBI ला 4.23 कोटींचा गंडा

ऑनलाईन औषध खरेदी धोकादायक का?

  • डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शनचा वापर होण्याची शक्यता

  • नशा आणणारी किंवा प्रतिबंधित औषधे सहज उपलब्ध होण्याचा धोका

  • औषधांची गुणवत्ता, मुदत आणि साठवणुकीची खातरजमा कठीण

  • रुग्णाच्या वैद्यकीय इतिहासाची पडताळणी होत नाही

  • चुकीचे औषध किंवा चुकीचा डोस मिळण्याचा संभव

  • नोंदणीकृत फार्मासिस्टचे मार्गदर्शन मिळत नाही

  • साइड इफेक्ट्‌‍स किंवा औषधांच्या परस्पर परिणामांचा धोका वाढतो

Medicine
Dumper Accident Death Case: मांजरी-केशवनगर मृत्यू प्रकरणाचा उलगडा; डंपरच्या धडकेत मृत्यू

औषध ही सामान्य वस्तू नसून ती थेट मानवी आरोग्याशी संबंधित बाब आहे. डॉक्टरांचा सल्ला आणि फार्मासिस्टचे मार्गदर्शन न घेता औषधांचा वापर धोकादायक ठरू शकतो. औषध विक्रीत नोंदणीकृत फार्मासिस्टची उपस्थिती अत्यावश्यक असल्याचे आहे.

अनिल बेलकर, सचिव, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news