Pune Eye Surgery Death: पुण्यात शस्त्रक्रियेनंतर 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; दीनानाथ रुग्णालयावर गंभीर आरोप

डोळ्यांच्या तिरळेपणावरील ऑपरेशनदरम्यान प्रकृती बिघडली; भूल अधिक दिल्याचा पालकांचा आरोप
Doctor negligence case
Doctor negligence casePudhari
Published on
Updated on

पुणे: डोळ्यांच्या तिरळेपणावरील शस्त्रक्रियेदरम्यान सहावर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एरंडवणेतील दीनानाथ रुग्णालयात ही घटना घडली. शस्त्रक्रियेपूर्वी मुलीची प्रकृती चांगली होती, शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती बिघडली. डॉक्टरांच्या चुकीमुळे, भुलीचे प्रमाण अधिक झाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते.

Doctor negligence case
SBI Gold Loan Fraud: पुण्यात ‘बनावट सोन्याचा’ मोठा घोटाळा! SBI ला 4.23 कोटींचा गंडा

प्रियांशी जितेंद्र बागडे (वय 6, रा. गोंदिया) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलीच्या डोळ्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, सहा वर्षांच्या मुलीवर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.

Doctor negligence case
Dumper Accident Death Case: मांजरी-केशवनगर मृत्यू प्रकरणाचा उलगडा; डंपरच्या धडकेत मृत्यू

मात्र, त्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला. त्याबाबत वडील जितेंद्र बागडे यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आज शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली असून, सर्व माहिती आणि रिपोर्ट संबंधित मेडिकल बोर्डाकडे पाठविण्यात आले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही होईल. तसेच, संबंधित डॉक्टरांचे जाबाबही नोंदवून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

Doctor negligence case
Khadakwasla Rajgad Tourism: राजगड-खडकवासला परिसरात पर्यटनाला मोठी चालना

दरम्यान, ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना मुलीची प्रकृती पूर्णपणे ठणठणीत होती. तिचे सर्व वैद्यकीय रिपोर्टही व्यवस्थित होते. असे असताना शस्त्रक्रियेदरम्यान असे काय झाले की, तिची प्रकृती गंभीर झाली. डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने किंवा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात भूल दिल्यामुळे तिचा जीव गेल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

Doctor negligence case
Pune Encroachment Issue: हडपसर-मांजरी बैठकीत अतिक्रमण व होर्डिंगवरून प्रशासनाला जाब

झालेली घटना अत्यंत दर्दैवी आहे. याची रुग्णालय सखोल चौकशी करत आहे. या संदर्भातील सर्व कागदपत्रे आणि माहिती आमच्याकडून पोलिस तसेच ससून रुग्णालय प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत माहिती देताना आम्ही पारदर्शकता आणि जबाबदारी ठेवून सहकार्य करत आहोत.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news