

मिलिंद कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब—ुवारी 2017 नंतर आता काही महिन्यांनी होणार आहे. सन 2017 मध्ये शहराची मतदारसंख्या 11 लाख 92 हजार 89 इतकी होती. आता सुमारे पावणेनऊ वर्षांनंतर महापालिका निवडणूक होत असून, या कालावधीत शहराची मतदारसंख्या 5 लाखांनी वाढली आहे. लोकवस्ती वाढल्याने तसेच, नवमतदारांची भर पडल्याने मतदारसंख्येत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
शहराच्या सन 2011 च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यावेळेस शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 इतकी होती. आता, ही लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे गेल्याचा अंदाज आहे. तसेच, मतदार संख्येतही मोठी वाढ झाली आहे. (Latest Pimpari chinchwad News)
फेब्रुवारी 2014 आणि फेब्रुवारी 2017 ला झालेल्या निवडणुकीत सन 2011ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली होती. फेब्रुवारी 2017 नंतर आता होत असलेल्या निवडणुकीसाठीही सन 2011च्या जनगणनेनुसार प्रभागरचना करण्यात आली आहे. असे असले तरी, आतापर्यंतच्या मतदार संख्या लक्षात घेऊन प्रभागनिहाय मतदार यादी तयार केली जाणार आहे. त्या वेळी एका प्रभागात किमान 26 हजार आणि कमाल 49 हजार इतकी मतदार संख्या होती.
गेल्या पावणेनऊ वर्षांत शहरात 5 लाख 16 हजार 698 इतकी मतदार संख्या वाढली आहे. सध्याची शहराची एकूण मतदारसंख्या 17 लाख 8 हजार 787 इतकी आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 6 लाख 79 हजार 858 इतके मतदार आहेत. त्यात 3 लाख 56 हजार 525 पुरुष आणि 3 लाख 23 हजार 274 महिला व 59 तृतीयपंथी मतदार आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण 6 लाख 29 हजार 129 मतदार आहेत. त्यात पुरुष 3 लाख 38 हजार 322, महिला 2 लाख 90 हजार 707 व तृतीयपंथी 100 मतदार आहेत.पिंपरी विधानसभेत एकूण 3 लाख 99 हजार 500 मतदार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम आल्यानंतर महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून प्रभागनिहाय मतदार यादीचे काम केले जाईल. विधानसभेची मतदार यादी फोडून 1 ते 32 अशी प्रभागात ती विभागली जाईल. त्या 32 मतदार याद्या महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एका प्रभागात मतदार संख्या 45 ते 55 हजार इतकी असणार आहे. प्रभागात वाढलेल्या मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी अधिकची मेहनत घ्यावी लागणार आहे.
1-33 हजार 794; 2-28 हजार 285; 3-29 हजार 168; 4-36 हजार 666; 5-27 हजार 799; 6-33 हजार 209; 7-31 हजार 990; 8-34 हजार 917; 9-49 हजार 112; 10-41 हजार 564; 11-35 हजार 592; 12-36 हजार 263; 13-41 हजार 494; 14-45 हजार 704; 15-40 हजार 982; 16-39 हजार 717;
17-41 हजार 436; 18-43 हजार 208; 19-46 हजार 696; 20-39 हजार 462; 21-47 हजार 614; 22-39 हजार 999; 23-26 हजार 371; 24-29 हजार 665; 25-25 हजार 881; 26-39 हजार 95; 27-33 हजार 254; 28-36 हजार 625; 29-36 हजार 501; 30-44 हजार 408; 31-38 हजार 987; 32-36 हजार 631.
शहरात सर्वांत कमी मतदान प्रभाग क्रमांक 23 थेरगाव, साईनाथनगर या प्रभागात होते. तेथे केवळ 26 हजार 371 मतदार होते. तर, सर्वांधिक मतदार संख्या असलेला प्रभाग क्रमांक 9 नेहरूनगर, मासुळकर कॉलनी, खराळवाडी होता. त्या प्रभागात तब्बल 49 हजार 112 मतदार होते.
मतदार यादी बनविण्याबाबत अद्याप राज्य निवडणूक आयोगाकडून निर्देश आलेले नाहीत. निवडणूक आयोगाकडून विधानसभानिहाय मतदार यादी मागविण्यात आली आहे. मतदार यादीबाबत कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या फोडण्यात येतील. मात्र, मतदार यादी कोणत्या तारखेपर्यंत ग्राह्य धरायची याबाबत काही सूचना नाहीत, असे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.
पिंपरी : 3 लाख 99 हजार 800
चिंचवड : 6 लाख 79 हजार 858
भोसरी : 6 लाख 29 हजार 129
एकूण : 17 लाख 8 हजार 787
फेब—ुवारी 2017 च्या निवडणुकीतील मतदार संख्या- 11 लाख 92 हजार 89
आगामी निवडणुकीसाठी मतदार संख्या - 17 लाख 8 हजार 787
एका प्रभागात असणार 45 ते 55 हजार मतदार