Pune Superstition Case: प्रार्थनेतून कॅन्सर बरा करण्याचा दावा; पास्टर केनेथ सिल्वे यांच्यासह अन्यांविरुद्ध गुन्हा

कोंढव्यातील चर्चमधील प्रार्थना सभेवर कारवाई; अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

पुणे: प्रार्थनेद्वारे कॅन्सर, ट्युमरसारखे असाध्य आजार बरे करण्याचा दावा करत अंधश्रद्धा पसरविल्याच्या आरोपावरून पास्टर केनेथ पॉल सिल्वे यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील शिवनेरीनगर येथील 'जीजस इज लॉर्ड चर्च'मध्ये घडली.

Crime
Pune Crime: पुण्यात रिअल इस्टेट व्यावसायिकाची आत्महत्या; पत्नी व सावत्र मुलांविरोधात गुन्हा

याबाबत भाग्यश्री सूर्यकांत मोहिते (वय ३२, रा. येरवडा, गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पास्टर केनेथ पॉल सिल्वे (रा. क्विन्स टाउन, चिंचवड) यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ, व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ च्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Crime
Pune Odd Even Water Supply: पुण्यात सम-विषम पाणीपुरवठ्याची सुरुवात; तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यावर भर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अंधश्रद्धा निर्मूलन मिशन संस्थेच्या सदस्य आहेत. पास्टर केनेथ सिल्वे हे 'जीजस इज लॉर्ड चर्च'मध्ये प्रार्थना सभा घेणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार, फिर्यादी त्यांच्या मैत्रीण निशा विनू वाघिरे यांच्यासह तेथे गेल्या. तेथे उपस्थित स्वयंसेवकांनी फिर्यादींना २० रुपये घेऊन प्लास्टिकच्या बाटलीत पाणी दिले. तसेच, “कुठलाही आजार असेल तर हे पाणी त्या ठिकाणी लावा, त्यामुळे आजार कमी होईल,” असे सांगितले. त्यानंतर पास्टर केनेथ सिल्वे हे स्टेजवर उभे राहून माइकवरून उपस्थितांना संबोधित केले.

Crime
Kothrud SRA Project Irregularities: कोथरूडच्या गोसावी वस्ती एसआरए प्रकल्पात अनियमिततेचा आरोप

“शरीराच्या ज्या भागात आजार आहे, त्या ठिकाणी उजवा हात ठेवा. कॅन्सर, ट्युमर किंवा कोणताही आजार असेल, तर येशू आज तुम्हाला बरे करणार आहे,” असे सांगत ते प्रार्थना करीत होते. फिर्यादी व त्यांची मैत्रीण मोबाईलवर चित्रीकरण करीत होत्या. त्या वेळी सात ते आठ महिला स्वयंसेवकांनी त्यांना चित्रीकरण करण्यापासून रोखले. तसेच, धक्काबुक्की करून मोबाईलमधील चित्रीकरण केलेले व्हिडिओ डिलीट केल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.

Crime
Balbharati Marathi Textbook: चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकात भाषिक कौशल्य विकासावर भर; बालभारतीचे नवे पुस्तक सादर

फिर्यादींनी थेट कोंढवा पोलिस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी पास्टर केनेथ पॉल सिल्वे यांच्यासह सात ते आठ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी दिली. पुढील तपास गुन्हे निरीक्षक प्रशांत मंडले करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news