Saswad Jowar Market Price: सासवड उपबाजारात ज्वारीला उच्चांकी दर

निरा बाजार समितीत प्रतिक्विंटल ४०११ रुपयांवर ज्वारीची विक्री
Jowar
JowarPudhari
Published on
Updated on

सासवड: पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील उपबाजारात धान्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. बुधवारी (दि. 31) ज्वारीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 4 हजार 11 रुपयांचा दर मिळाल्याची माहिती निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली.

Jowar
New Year APK Scam: नववर्षाच्या शुभेच्छांच्या नावाखाली एपीके फाईल फसवणूक; पोलिसांचा इशारा

सासवड उपबाजारात वाल्हा, राजुरी, वाघापूर, माळशिरस, गराडे, परिंचे, वीर, दिवे यासह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते.

Jowar
Battle of Bhima Koregaon: भीमा कोरेगाव युद्धामागचा इतिहास काय आहे? 1 जानेवारी 1818 ला नेमकं काय घडलं होतं?

बुधवारी सासवड उपबाजारात एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4 हजार 11 रुपये, तर दोन नंबर प्रतिच्या ज्वारीला किमान 2 हजार 900 हजार रुपये आणि सरासरी 3 हजार 455 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, असे बाजार समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले.

Jowar
Congress Shiv Sena MNS Seat Sharing: काँग्रेस-शिवसेना-मनसे आघाडीत उमेदवारीचा गोंधळ

या वेळी सभापती संदीप फडतरे, उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, महादेव टिळेकर, वामन भाऊ कामठे, गणेश होले, देविदास कामठे, सुशांत कांबळे, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, शरयू वाबळे, भाऊसाहेब गुलदगड, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास कांबळे यासह व्यापारी आर. के. ट्रेडर्सचे रूपचंद कांडगे, आर. आर. ट्रेडर्सचे राजेंद्र जळींद्रे, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, शैलेश वीरकर आदी उपस्थित होते.

Jowar
Pune Election AB Form Theft: धनकवडीत एबी फॉर्मची पळवा-पळवी; उमेदवारावर गुन्हा दाखल

दरम्यान निरा बाजार समितीमध्ये गुळाची आवक 214 बॉक्स म्हणजेच 42 क्विंटल असल्याची माहिती सहसचिव नितिन किकले, कृष्णात खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी दिली. या वेळी गूळ व्यापारी शांतिकुमार कोठडिया आदी उपस्थित होते.

निरा बाजारातील गुळाची आवक दर (क्विंटल)

गूळ: किमान: 3800

कमाल: 4300

सरासरी: 4150

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news