Sassoon hospital : डॉ. तावरेला सुरुवातीपासूनच आर्थिक लाभाचा ‘संसर्ग’

Sassoon hospital : डॉ. तावरेला सुरुवातीपासूनच आर्थिक लाभाचा ‘संसर्ग’
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याने डॉ. अजय तावरेला अटक करण्यात आली. ससूनमध्ये यापूर्वीही डॉ. तावरेने अनेक गैरप्रकार केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, वरिष्ठांच्या मर्जीने त्याने दोनदा वैद्यकीय अधीक्षकपद उपभोगले. सुरुवातीला डॉ. तावरेकडे सलग सात वर्षे अधीक्षकपद असल्याचे निदर्शनास आले आहे.
ससूनमध्ये दर महिन्याला वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रमाणपत्र देण्यासाठी लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे अधीक्षकपदाकडे 'क्रिमी पोस्ट' म्हणून पाहिले जाते. त्यामुळे डॉ. तावरेने वारंवार हे पद मिळविण्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा प्रयोग केला. तो न्यायवैद्यकशास्त्रातील प्राध्यापक असल्याने शवविच्छेदन अहवाल देणे, फेरफार करणे, त्यासाठी आर्थिक लाभाची मागणी करणे, अशा अनेक कारणांमुळे डॉ.

तावरे ससूनमध्ये कायम चर्चेत  असायचा. त्यामुळे शहरातील धनदांडग्यांमध्येही त्याची 'ससूनमधील कामाचा अधिकारी' अशी ओळख होती. अगरवाल प्रकरणानिमित्त त्याचा पुन्हा प्रत्यय आल्याचे बोलले जात आहे. डॉ. अजय तावरे बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात तो सहायक प्राध्यापक म्हणून 2007 मध्ये रुजू झाला. त्यानंतर 2013 मध्ये त्याची सहयोगी प्राध्यापक म्हणून पदोन्नती झाली. डॉ. तावरेला 2021 मध्ये प्राध्यापकपद देण्यात आले. त्याने सुरुवातीपासून फोरेन्सिक विभागात काम केले.  डिसेंबर 2023 मध्ये त्याला फोरेन्सिक विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. विभागप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर त्याला आयते कोलीतच मिळाले. त्यातून त्याने अनेकदा धनलाभ करून घेतला, अशी चर्चा आहे.

ससूनमध्ये गटातटाचे राजकारण

ससूनमध्ये वरिष्ठांमध्ये गटातटाचे राजकारण पाहायला मिळते. दोन्ही गटांची सूत्रे मुंबईतील अतिवरिष्ठांकडून हलवली जातात. आपल्या गटातील अधिष्ठाता, आपल्याच गटातील वैद्यकीय अधीक्षक नेमण्यासाठी राजकारण केले जाते. त्यामुळेच दीड वर्षात सहा अधीक्षक बदलले गेले. आत्तापर्यंत अधिष्ठाता आपल्या मर्जीतील माणसाची अधीक्षकपदी नेमणूक करीत होते. ही रस्सीखेच थांबविण्यासाठी अधीक्षकपद हे 'गट-अ'चे असल्याने ते प्राध्यापक संवर्गातून भरणे आवश्यक आहे. त्यामुळे या पदाची नियुक्ती यापुढे राज्य शासनाकडून भरले जाईल, असे आदेश राज्य शासनाने 8 मे रोजी काढले आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news