Sanaswadi Mephedrone Seizure: सणसवाडीत कोटींचा ड्रग्ज साठा उघड; 1.80 कोटींचे मेफेड्रॉन जप्त

कस्टम विभागाची धडक कारवाई; राजस्थानच्या ड्रगतस्कराला अटक, फ्लॅटमधून 898 ग्रॅम एमडी जप्त
Drug Racket
Drug RacketPudhari
Published on
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्यातील सणसवाडी परिसरात सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अमली पदार्थविरोधी पथकाने धडक कारवाई करीत विक्रीसाठी बाळगलेले तब्बल 1 कोटी 79 लाखांहून अधिक रकमेचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले. सणसवाडीमधील फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात तब्बल 898 ग््रॉम 94 मिलिग््रॉम मेफेड्रॉन जप्त करीत राजस्थानच्या ड्रगतस्कराला बेड्या ठोकल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी कुरकुंभमधील ड्रग कारखान्यावरील कारवाईनंतर पहिल्यांदाच पुणे ग््राामीण औद्योगिक पट्‌‍ट्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Drug Racket
PMPML: ‘मिशन 100 दिवस’; पीएमपीचा चेहरामोहरा बदलणार — अध्यक्ष महेश आव्हाड

याप्रकरणी सागरमल ऊर्फ सागर बिष्णोई (वय 26, रा. जोधपूर, राजस्थान) याला अटक केली आहे. यासंदर्भात कस्टम विभागाचे महेंद्र पांचाल यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी मूळचा राजस्थानमधील असून, सध्या तो सणसवाडी परिसरातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहत होता आणि तेथूनच मेफेड्रॉनची विक्री करीत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

अमली पदार्थांची विक्री करणारा एक तरुण सणसवाडी परिसरात राहत असल्याची गोपनीय माहिती

8पान 4 वर (पान 1 वरुन) अमलीपदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पंचांसमवेत 11 मार्चच्या रात्री उशिरा संबंधित सोसायटीतील फ्लॅटवर छापा टाकण्याचे नियोजन केले.

Drug Racket
PMPML Chairman: 19 वर्षांत 23 अध्यक्ष; पीएमपीमध्ये अधिकाऱ्यांची ‘संगीत खुर्ची’

अधिकारी फ्लॅटवर पोहोचल्यानंतर दार ठोठावले असता एक तरुण बाहेर आला. त्याची ओळख पटवून अधिकाऱ्यांनी त्याला शोध परवानगी दाखवली आणि फ्लॅटची तपासणी सुरू केली. 400 चौरस फूट क्षेत्रफळाच्या या फ्लॅटमध्ये एक हॉल, एक बेडरूम, स्वयंपाकघर आणि गॅलरी होती. फ्लॅटमध्ये फारसे फर्नचिर नव्हते. तपासणीदरम्यान बेडरूममध्ये ठेवलेल्या गुलाबी रंगाच्या बॅगेत संशयास्पद वस्तू आढळल्या. अधिकाऱ्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात ऑफ व्हाइट रंगाची पावडर असलेल्या सहा प्लास्टिक पिशव्या सापडल्या. तपासणी केल्यानंतर ती पावडर मेफेड्रॉन (एमडी) असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे एकूण वजन 898 ग््रॉम 94 मिलिग््रॉम असल्याचे आढळले. याशिवाय त्या बॅगेतून लहान प्लास्टिक पिशव्या, दोन छोटे चमचे तसेच इलेक्ट्रॉनिक वजन काटाही जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपीने मेफेड्रॉन लहान लहान प्रमाणात पॅक करून ग््रााहकांना विक्रीसाठी देत असल्याचे सांगितल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

Drug Racket
Pune Women Bike Rally: गुढीपाडव्यानिमित्त पुण्यात महिलांची भव्य बाईक रॅली; ‘पुढारी कस्तुरी क्लब’चा स्त्रीशक्तीचा जागर

अधिकारी फ्लॅटवर पोहोचल्यानंतर दार ठोठावले असता एक तरुण बाहेर आला. त्याची ओळख पटवून अधिकाऱ्यांनी त्याला शोध परवानगी दाखवली आणि फ्लॅटची तपासणी सुरू केली. 400 चौरस फूट क्षेत्रफळाच्या या फ्लॅटमध्ये एक हॉल, एक बेडरूम, स्वयंपाकघर आणि गॅलरी होती. फ्लॅटमध्ये फारसे फर्नचिर नव्हते. तपासणीदरम्यान बेडरूममध्ये ठेवलेल्या गुलाबी रंगाच्या बॅगेत संशयास्पद वस्तू आढळल्या. अधिकाऱ्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात ऑफ व्हाइट रंगाची पावडर असलेल्या सहा प्लास्टिक पिशव्या सापडल्या. तपासणी केल्यानंतर ती पावडर मेफेड्रॉन (एमडी) असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे एकूण वजन 898 ग््रॉम 94 मिलिग््रॉम असल्याचे आढळले. याशिवाय त्या बॅगेतून लहान प्लास्टिक पिशव्या, दोन छोटे चमचे तसेच इलेक्ट्रॉनिक वजन काटाही जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपीने मेफेड्रॉन लहान लहान प्रमाणात पॅक करून ग््रााहकांना विक्रीसाठी देत असल्याचे सांगितल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

Drug Racket
Pune Hotels Crisis: गॅस कपातीचा फटका; पुण्यात हॉटेल्सच्या मेनूमधून भजी-वडे, चहा गायब

याप्रकरणी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली. त्याला कस्टम विभागाने विशेष न्यायालयात हजर केले.

विशेष सरकारी वकील ऋषिराज वाळवेकर यांनी आरोपीने मेफेड्रॉनचा साठा कुठून आणला तसेच तो कोणाला पुरवठा करीत होता, याचा तपास करण्यासाठी व अमली पदार्थांच्या व्यवहारामागील इतर साथीदारांचा शोध घेऊन जाळे उघड करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) एस. जी. जोशी यांनी 13 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास कस्टम विभागातील अमलीपदार्थविरोधी पथक करीत आहे.

Drug Racket
NEP Discussion: ‘पुढारी एज्युदिशा’ विशेष परिसंवाद; नव्या शिक्षण धोरणावर दिग्गज शिक्षणतज्ज्ञांची सखोल चर्चा

आयटीतील ‌‘त्या‌’ तरुणीकडेही विचारपूस

सोसायटीतील कर्मचाऱ्यांकडून आरोपीसोबत एका तरुणीचेही वास्तव्य असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानंतर परिसरात शोध घेतल्यानंतर ती तरुणी सोसायटी परिसरात आढळून आली. तिला फ्लॅटवर आणून चौकशी करण्यात आली असता तिने अमलीपदार्थांच्या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचे सांगितले. ती आयटी क्षेत्रातील एका कंपनीत नोकरी करीत असल्याची माहितीही तिने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news