

पुणे : ‘नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, आव्हाने आणि बलस्थाने’ या विषयावर पुढारी न्यूज चॅनलवर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. खास विद्यार्थासाठी 14 व 15 मार्च रोजी दुपारी 3.20 वाजता राज्यातील दिग्गज शिक्षणतज्ज्ञ नवीन शिक्षण धोरण अर्थात न्यू एज्युकेशन पॉलिसी (एनईपी ) या विषयावर सविस्तर बोलणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने पाहावा असाच हा कार्यक्रम आहे.
पुढारी एज्युदिशा एनईपी 2020 च्या अंमलबजावणीचा चार वर्षांचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. पुस्तकी ज्ञानाकडून कौशल्याकडे वळताना शिक्षण व्यवस्थेत नेमके काय बदल दिसत आहेत? अंमलबजावणीच्या या टप्प्यावर कोणती आव्हानं जाणवली आहेत? यावर सर्वंकष चर्चा करण्यासाठी ‘पुढारी एज्युदिशा’ या विशेष परिसंवादाचे आयोजन शनिवारी
14 आणि रविवारी 15 मार्च रोजी करण्यात आले आहे. दोन दिवस
हा कार्यक्रम दुपारी 3.20 पाहावयास मिळेल.
‘नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, आव्हाने आणि बलस्थाने’ या विषयावर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांसमवेत सखोल चर्चा होणार आहे. या कार्यक्रमात डॉ. अभय जेरे (माजी उपाध्यक्ष, एआयसीटीई), डॉ. रवि चिटणीस (कुलगुरू, एमआयटी, डल्ब्यूपीयू, पुणे ), डॉ. विवेक सावजी (कुलगुरू, भारती विद्यापीठ), डॉ. मुकुंद कुलकर्णी (कुलगुरू, विश्वकर्मा विद्यापीठ), डॉ. संतोष सोनवणे (कुलगुरू, पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, पुणे), डॉ. प्रफुल्ल हत्ते (अधिष्ठाता, एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदी, पुणे), डॉ. मोहन वामन (कुलगुरू, ज्ञानप्रसाद ग्लोबल विद्यापीठ, पुणे)