PMPML: ‘मिशन 100 दिवस’; पीएमपीचा चेहरामोहरा बदलणार — अध्यक्ष महेश आव्हाड

मेट्रो फिडर सेवा, रूट रॅशनलायझेशन आणि बस बेकडाऊनवर कडक पावले; पुणेकरांना वेळेवर बससेवेचे आश्वासन
PMPML
PMPMLPudhari
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे : पुणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीच्या सेवेला अधिक सक्षम, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनविण्यासाठी आता मिशन 100 दिवस राबवले जाणार आहे. पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी दै. ‌‘पुढारी‌’च्या प्रतिनिधीशी बोलताना गुरुवारी (दि.12) या बदलांचा महत्त्वाकांक्षी रोडमॅप स्पष्ट केला.

PMPML
PMPML Chairman: 19 वर्षांत 23 अध्यक्ष; पीएमपीमध्ये अधिकाऱ्यांची ‘संगीत खुर्ची’

मेट्रो फिडरसेवा आणि वाहतूक कोंडीवर प्रहार

शहरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. ते म्हणाले, पुणेकरांना मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी भक्कम फिडर बससेवा देण्यावर आमचा भर असेल. जर प्रवाशांना घरापासून मेट्रोपर्यंत आणि मेट्रोपासून कार्यालयापर्यंत वेळेवर बस मिळाली, तर नागरिक खासगी वाहने सोडून सार्वजनिक वाहतुकीकडे वळतील. यामुळे रस्ते अपघात कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

PMPML
Pune Women Bike Rally: गुढीपाडव्यानिमित्त पुण्यात महिलांची भव्य बाईक रॅली; ‘पुढारी कस्तुरी क्लब’चा स्त्रीशक्तीचा जागर

पुणेकरांना सुरक्षित, आरामदायी, विश्वासर्ह आणि स्वच्छ सेवा देणे, हे माझे मुख्य ध्येय आहे. कार्यालयीन शिस्त आणि कामाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही 100 दिवसांचा विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक विभागाला टार्गेट दिले जाईल आणि कामात कुचराई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. आमचा प्रयत्न पीएमपीला पुणेकरांच्या पसंतीची पहिली निवड बनविण्याचा आहे.

महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

PMPML
Pune Hotels Crisis: गॅस कपातीचा फटका; पुण्यात हॉटेल्सच्या मेनूमधून भजी-वडे, चहा गायब

रूट रॅशनलायझेशन आणि कार्यक्षमता वाढवणे

प्रशासकीय सुधारणांसाठी आव्हाड यांनी कंबर कसली आहे. अनावश्यक मार्गावरील बस कमी करून, जिथे गरज आहे तिथे गाड्यांची संख्या वाढवली जाईल (रूट रॅशनलायझेशन). यामुळे बसची फिक्वेन्सी वाढून प्रवाशांची प्रतीक्षा वेळ कमी होईल. तसेच, बंद पडलेल्या बीआरटी मार्गांचा तांत्रिक अभ्यास करून ते पुन्हा कार्यान्वित करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.

बेकडाऊन रोखण्यासाठी कडक पावले

सध्या पीएमपी बस रस्त्यात बंद पडण्याचे (बेकडाऊन) प्रमाण मोठे आहे. यावर बोलताना ते म्हणाले, कोणत्या डेपोच्या आणि कोणत्या भागातील गाड्या जास्त बंद पडतात, याचा सखोल अभ्यास सुरू आहे. दोषी ठेकेदारांना आणि निकृष्ट दर्जाचे सुटे भाग पुरविणाऱ्या व्हेंडरना कडक शब्दांत समज देण्यात येईल. बस वेळेवर आणि सुस्थितीत रस्त्यावर धावणे ही आमची प्राथमिकता आहे.

PMPML
Pudhari MHT CET Course: एमएचटी-सीईटीमध्ये जास्त गुणांसाठी 30 दिवसांचा विशेष ऑनलाइन कोर्स; तारीख काय, कसे सहभागी व्हाल?

पुणेकरांना वेळेवर बस उपलब्ध करून देणार

पुणे : पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी गुरुवारी (दि. 12) पदभार स्वीकारला आहे. त्या वेळी त्यांनी पुणेकरांना मुंबईच्या धर्तीवर वेळेत बससेवा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. नियुक्तीनंतर पहिल्याच दिवशी आव्हाड यांनी पीएमपीएमएलमध्ये हजेरी लावत, पदभार स्वीकारला. या वेळी पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालिका ॲलिस पोरे यांच्यासह सर्व विभागप्रमुखांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. त्यानंतर त्यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुणेकरांना वेळेवर बस उपलब्ध होतील, यादृष्टीने काम हाती घेणार असल्याचे सांगितले. त्या अनुषंगानेच पहिल्या टप्प्यात कामे केली जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news