

पुणे: विकसकाच्या थकबाकीमुळे अडचणीत आलेल्या मंगळवार पेठेतील सदा आनंदनगर सोसायटीच्या 3 हजारांहून अधिक रहिवाशांना प्रशासनाच्या मदतीने दिलासा देण्याचे काम पुणे महापालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केले. सोसायटीतील रहिवाशांनी या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, प्रभागातील नागरिकांकडूनही गणेश बिडकर यांचे कौतुक होते आहे.
विकसकाने थकबाकी ठेवलेल्या सदा आनंदनगर सोसायटीला अनेक समस्यांनी ग््राासले होते. गेल्या सोसायटीची आर्थिक स्थितीही बेताची असल्याने रहिवाशांसमोर अडचणींचा डोंगर उभा होता. 3 हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन गणेश बिडकर यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधला आणि समस्यांचा पाठपुरावा केला. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे दीपक मुंडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
प्रशासकाच्या नेमणुकीमुळे सोसायटीच्या कारभारात पारदर्शकता आली. सदा आनंदनगर सोसायटीच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी बिडकर यांनी अडीच लाख रुपयांची मदत जाहीर केली. सोसायटीच्या सभासदांनी त्यात दोन लाख रुपयांची भर घालत प्रलंबित कामे पूर्ण केली.
दरम्यान, बिडकर यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाठपुरावा करून सोसायटीतून तब्बल 25 टन कचरा उपसला, बंद असलेली लिफ्ट दुरुस्त करून कार्यान्वित केली आणि विजेचा खर्च वाचवण्यासाठी सोलर पॅनेलचे काम पूर्ण केले. आता प्रशासकांच्या मदतीने सदा आनंदनगर सोसायटीच्या समस्यांचा आढावा घेऊन विकास आराखडा तयार केला आहे. यात सोसायटीमधील सर्व सात लिफ्टची दुरुस्ती करणे, सी विंगवर सोलर पॅनेल बसवणे, पाणीपुरवठ्यासाठी नव्या मोटर लावणे, सीसीटीव्ही लावणे, तसेच पाइपलाइन आणि कोबा करणे या कामांचा समावेश असणार आहे.
सदा आनंदनगरमधील रहिवाशांच्या समस्या गंभीर होत्या. त्याची माहिती मिळताच प्रशासनाशी संपर्क साधून प्रशासकाची नेमणूक करण्याची विनंती मी केली आणि विजेचे थकलेले बिल भरण्यासाठी मुदत वाढवून घेतली. गेले वर्षभर सोसायटीमध्ये विविध कामे केली जात असून, सोसायटीचे रूप बदलून गेले आहे.
गणेश बिडकर, माजी सभागृह नेते, पुणे महानगरपालिका