Pune Student Safety: शिक्षणाच्या वाटेवर मुली असुरक्षित; छेडछाडीविरोधात समाजाने पुढे येण्याची गरज

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पोलिस गस्त, जनजागृती आणि सुरक्षित वातावरणाची मागणी
Road Romeo
Road RomeoPudhari
Published on
Updated on

शिवदास शितोळे

परिंचे: ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी दररोज बसने किंवा पायी प्रवास करून शाळा आणि महाविद्यालयात जातात. घरापासून बसस्थानक, सार्वजनिक रस्ते आणि महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंतचा प्रवास अनेकदा त्यांच्यासाठी असुरक्षित ठरत असल्याचे वास्तव आहे. टवाळखोरांकडून होणारी छेडछाड, अश्लील टिप्पणी आणि पाठलाग, यामुळे अनेक मुली मानसिक तणावाखाली शिक्षण घेत आहेत.

Road Romeo
Mauli Palkhi Sohala: रिमझिम पावसात निरा नगरीत माउलींचे स्वागत; निरामाईच्या तीर्थाने पादुकांना घातले स्नान

शिक्षण बंद होण्याच्या भीतीने अनेक मुली घरीही याबाबत बोलत नाहीत; मात्र काही धाडसी विद्यार्थिनी पुढे येऊन तक्रार दाखल करतात आणि कायद्याची मदत घेतात. अशा मुलींच्या पाठीशी केवळ पालकांनीच नव्हे, तर संपूर्ण समाजाने ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.

Road Romeo
Nira River Historic Bridge Damage: निरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचे डांबरीकरण पहिल्याच पुरात उखडले; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

मुलींच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे महत्त्वाचे असले, तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी, सातत्यपूर्ण जनजागृती आणि समाजातील सकारात्मक बदल अधिक आवश्यक आहेत. कोणत्याही मुलीची छेडछाड होताना दिसल्यास नागरिकांनी बघ्याची भूमिका न घेता तत्काळ हस्तक्षेप करणे, हीही सामाजिक जबाबदारी आहे.

Road Romeo
Junnar Congress Internal Dispute: जुन्नर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर; तालुकाध्यक्ष बदलानंतर संघटना मजबूत करण्याचे आव्हान

आवश्यक उपाययोजना

  • शाळा-महाविद्यालय परिसरात नियमित पोलिस गस्त.

  • सीसीटीव्ही, पुरेसा प्रकाश आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था.

  • प्रत्येक शैक्षणिक संस्थेत तक्रार निवारण समिती.

  • विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी नियमित जनजागृती कार्यक्रम.

  • स्वसंरक्षण व सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण.

  • छेडछाडीच्या घटनांवर तातडीची, निष्पक्ष कारवाई.

Road Romeo
Ghorpadi Railway Safety Issue: घोरपडीतील रेल्वे संरक्षक भिंत अपूर्ण; जीव धोक्यात घालून रुळ ओलांडणाऱ्यांची संख्या वाढली

पालकांनी मुलींशी विश्वासाचे आणि मैत्रीपूर्ण नाते निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. विविध परिस्थितींना धैर्याने सामोरे जाण्याचे आणि स्वतःचे संरक्षण करण्याचे संस्कार घरातूनच झाले, तर अनेक अनुचित घटना टाळता येऊ शकतात.

ॲड. वनिता धुमाळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news