Nira River Historic Bridge Damage: निरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचे डांबरीकरण पहिल्याच पुरात उखडले; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

महापुरानंतर पुलावर पडले खड्डे; पालखी सोहळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी
Nira River Historic Bridge Damage
Nira River Historic Bridge DamagePudhari
Published on
Updated on

निरा: पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील निरा नदीवरील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन दगडी पुलावरून महापुराचे पाणी गेल्यानंतर सुमारे दीड महिन्यापूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परतीच्या पालखी सोहळ्यापूर्वी पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी निरा व पाडेगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Nira River Historic Bridge Damage
Junnar Congress Internal Dispute: जुन्नर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर; तालुकाध्यक्ष बदलानंतर संघटना मजबूत करण्याचे आव्हान

निरा खोऱ्यात शुक्रवारी (दि. ३१) झालेल्या मुसळधार पावसानंतर वीर धरणातून ६४ हजार ५२३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे निरा नदीला पूर आला आणि ब्रिटिशकालीन दगडी पुलावरून पाणी वाहू लागले.

Nira River Historic Bridge Damage
Ghorpadi Railway Safety Issue: घोरपडीतील रेल्वे संरक्षक भिंत अपूर्ण; जीव धोक्यात घालून रुळ ओलांडणाऱ्यांची संख्या वाढली

शनिवारी (दि. १) विसर्ग कमी झाल्यानंतर पाणी पुलाखालून वाहू लागले. त्यानंतर पुलावरील डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडल्याचे, तसेच कठड्यांवर झाडांच्या फांद्या व प्लास्टिकचा कचरा अडकल्याचे दिसून आले. त्यामुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांची गैरसोय झाली.

Nira River Historic Bridge Damage
Yerwada Sewage Problem: येरवड्यात शाळा-चर्चसमोर सांडपाण्याचे साम्राज्य; विद्यार्थ्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पुलावरील कचरा हटवून वाहतूक सुरळीत केली. मात्र, पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी अवघ्या काही तासांत करण्यात आलेले डांबरीकरण पहिल्याच मोठ्या पुरात उखडल्याने ग्रामस्थांनी कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

Nira River Historic Bridge Damage
Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळी ‘फुल्ल’; मुठा नदीत २९ हजार क्युसेक विसर्ग, पुणेकरांना सतर्कतेचा इशारा

ग्रामस्थांनी यापूर्वी या पुलावर सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याऐवजी डांबरीकरण करण्यात आले. आता पुरामुळे जागोजागी खड्डे पडल्याने भाविक, नागरिक आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news