Mauli Palkhi Sohala: रिमझिम पावसात निरा नगरीत माउलींचे स्वागत; निरामाईच्या तीर्थाने पादुकांना घातले स्नान

आळंदीकडे परतीच्या प्रवासातील पालखी सोहळा निरा येथे दाखल; दत्तघाटावर भक्तीमय वातावरण
Mauli Palkhi Sohala
Mauli Palkhi SohalaPudhari
Published on
Updated on

निरा: आषाढीवारीवरून माउलींचा पालखी सोहळा आळंदीकडे परतीच्या प्रवासाला निघाला आहे. माउलींचे परतीच्या प्रवासात पुणे जिल्ह्यातील निरा येथे सोमवारी (दि. ३) सकाळी ९.१० वाजता रिमझिम पावसात स्वागत झाले. त्या अगोदर दत्तघाटावर माउलींच्या पादुकांना माउली माउलींच्या जयघोषात निरास्नान घालण्यात आले.

Mauli Palkhi Sohala
Nira River Historic Bridge Damage: निरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचे डांबरीकरण पहिल्याच पुरात उखडले; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

रविवारी (दि. २) पाडेगाव (ता. फलटण) येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळा सोमवारी सकाळी आठ वाजता पुणे जिल्ह्यातील निरा नगरीकडे मार्गस्थ झाला. सकाळी पावणेनऊ वाजता सोहळा निरा नदीच्या दत्तघाटासमोर थांबला. माउलींच्या पादुकांना खळखळून वाहणाऱ्या निरामाईच्या पवित्र तीर्थाने पालखी सोहळा मालक राजेंद्र पवार-आरफळकर, आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते स्नान घालण्यात आले.

Mauli Palkhi Sohala
Junnar Congress Internal Dispute: जुन्नर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर; तालुकाध्यक्ष बदलानंतर संघटना मजबूत करण्याचे आव्हान

ब्रिटीशकालीन पुलावर रथापुढील व रथामागे रांगेत उभे असलेल्या विणेकऱ्यांना सोहळा मालकांनी माउलींचे निरास्नान झाल्यानंतर पादुकांचे स्पर्श दर्शन दिल्याचे आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप यांनी सांगितले. निरास्नानानंतर माउलींचा रथ निरा नगरीकडे मार्गस्थ झाला. उपसरपंच राजेश काकडे, निरा पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार संतोष मदने, नीलेश करे यांच्यासह ग्रामस्थांनी माउलींचे स्वागत केले.

Mauli Palkhi Sohala
Ghorpadi Railway Safety Issue: घोरपडीतील रेल्वे संरक्षक भिंत अपूर्ण; जीव धोक्यात घालून रुळ ओलांडणाऱ्यांची संख्या वाढली

सोहळा निरा गावात मार्गस्थ होत असताना रिमझिम पावसाच्या सरींनी देखील माउलींचे जोरदार स्वागत केले. सोहळा अहिल्यादेवी चौकात आल्यानंतर तरुणांनी माउलींची पालखी दुपारच्या विसाव्यासाठी विठ्ठल मंदिरात ठेवली. या वेळी असंख्य भाविकांनी माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतले.

Mauli Palkhi Sohala
Yerwada Sewage Problem: येरवड्यात शाळा-चर्चसमोर सांडपाण्याचे साम्राज्य; विद्यार्थ्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात

या वेळी सोमेश्वर सह. साखर कारखान्याच्या वतीने सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप यांनी सत्कार केला. या वेळी विश्वस्त मदन चव्हाण, प्रमोद गवळी, संतोष गांधी उपस्थित होते. दुपारी दीड वाजता सोहळा वाल्हे मुक्कामी मार्गस्थ झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news