Rupali Thombre On Chakankar Arrest: DNA टेस्टवरून महिलांच्या कुटुंबात वाद... खरात प्रकरणी चाकणकर फॅमिलीचे व्हिडिओ बाहेर आणा

Rupali Thombre On Chakankar Arrest
Rupali Thombre On Chakankar Arrestpudhari
Published on
Updated on

Rupali Thombre On Chakankar Arrest: राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर खरात प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ठोंबरेंनी या प्रकरणात रूपाली चाकणकरांना सहआरोपी करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि पीडित महिलांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे.

Rupali Thombre On Chakankar Arrest
Rupali Chakankar Resignation: पक्षात नसते तर या बाईला पुण्यात फिरू दिलं नसतं... संतापलेल्या ठोंबरेंनी चाकणकरांचं सगळंच काढलं

नेमके आरोप काय आहेत?

मिळालेल्या माहितीनुसार, खरातने पुणे येथील काही बड्या उद्योजकांना फसवल्याचे आणि अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोठी 'तोडपाणी' (आर्थिक व्यवहार) झाल्याचा दावा केला जात आहे. सर्वात धक्कादायक आरोप हा आहे की, ज्या वेळी या घटना घडल्या, त्यावेळेस रुपाली चाकणकर आयोगाच्या अध्यक्ष होत्या आणि त्यांच्या संमतीनेच महिलांना 'पत्रिका तपासणी' किंवा 'समुपदेशन' करण्याच्या नावाखाली ठराविक ठिकाणी पाठवले जात होते.

Rupali Thombre On Chakankar Arrest
Rupali Chakanakar: अशोक खरात प्रकरणाला नवं वळण; रूपाली चाकणकर फरार, रुपाली पाटील ठोंबरेंच्या पोस्टमुळे खळबळ

व्हिडीओ क्लिप्स आणि शोषणाचे सत्र

या प्रकरणातील पीडित महिलांनी असा दावा केला आहे की, त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे. "रोज एका नवीन महिलेचा व्हिडीओ बाहेर येत आहे. जर सुरुवातीलाच यावर कारवाई झाली असती, तर आज १५० पेक्षा जास्त महिलांचे शोषण झाले नसते," असे ठोंबरे यांनी म्हटले आहे. या व्हिडीओ क्लिप्स आधी पोलिसांकडे जाण्याऐवजी दाबण्याचा प्रयत्न झाला आणि खरात नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून चाकणकर यांनी मध्यस्थी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Rupali Thombre On Chakankar Arrest
Ashok Kharat controversy|'रक्ताच्या अभिषेका'वर सुनील तटकरेंचे स्पष्टीकरण, हसून सुषमा अंधारे म्हणाल्या, "सगळेच किती योगायोग.."

DNA टेस्ट आणि कौटुंबिक वाद

या प्रकरणात आता DNA टेस्टचे सत्र सुरू झाल्याने अनेक महिलांच्या कौटुंबिक जीवनात वादळ निर्माण झाले आहे. "माझ्याकडे अनेक महिला येत आहेत, त्यांना मी रीतसर तक्रार करायला सांगितली आहे. मात्र, महिलांची मानसिक तयारी झाल्याशिवाय मी त्यांना फोर्स करणे योग्य नाही," असेही रूपाली ठोंबरे यांनी स्पष्ट केले.

या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे धागेदोरे आहेत का? याची सखोल चौकशी करून त्यांचेही व्हिडीओ समोर आणावेत, अशी मागणी विरोधकांकडून आणि पीडितांकडून केली जात आहे. या आरोपामुळे आता राज्य महिला आयोगाची प्रतिमा डागाळली असून, पोलीस प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news