

पुणे : मुंबई आरटीओ येथून बोलत असल्याची बतावणी करीत गाडीवर चलन असल्याचे सांगून एकाची पाच लाखांची फसवणूक केली.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ते ६ डिसेंबरदरम्यान आनंदनगर, सिंहगड रोड येथील ४२ वर्षीय तक्रारदाराला सायबर चोरांनी मोबाईलवर संपर्क केला.
या वेळी त्यांनी मुंबई आरटीओ कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत तुमच्या गाडीवर चलन असल्याची बतावणी त्यांच्याकडे केली. त्यानंतर तक्रारदार यांच्या बँक खात्यातून आयएमपीएसद्वारे पाच लाख रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करीत त्यांची फसवणूक केली.
याप्रकरणी मोबाईल नंबरधारक आणि बँकधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) कदम करीत आहेत.