

पुणे : मोबाईल नंबरवर आलेल्या एका लिंकमुळे पाषाण परिसरातील एकाची ३ लाख ८३ हजार ८२२ रुपयांची फसवणूक झाली.
याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आर्मामेंट इस्टेट, पाषाण येथील एका रहिवाशाच्या मोबाईल नंबरवर १६ डिसेंबरदरम्यान एक लिंक आली होती.
त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्यातून ३ लाख ८२ हजार रुपये डेबिट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक भजनावळे करत आहेत.