पिंपरी शहरातील नद्या, महापालिकेच्या पाण्याची तपासणी होणार

पिंपरी शहरातील नद्या, महापालिकेच्या पाण्याची तपासणी होणार
Published on
Updated on

पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणार्‍या पवना, इंद्रायणी व मुळा नदी पात्रातील पाण्याची नियमितपणे तपासणी केली जाणार आहे. तसेच, महापालिकेच्या वतीने शहरात पुरवठा केले जाणारे पाणीही तपासले जाणार आहे. या माध्यमातून पाण्याची शुद्धता तपासली जाणार आहे.

पाण्याची शुद्धता समजणार

शहरातील पाण्याची तसेच, नद्यांच्या पाण्याची तपासणी महापालिकेमार्फत त्रयस्थ संस्थेच्या वतीने केली जाते. या माध्यमातून पाणी किती शुद्ध आहे. महापालिका नागरिकांना पाणीपुरवठा करीत असलेले पाणी शुद्ध व पिण्यायोग्य आहे का, नदी पात्रातील पाणी किती प्रदूषित आहे, जलचरांना त्यापासून धोका आहे का, आदींची तपासणी या माध्यमातून केली जाते. ही तपासणी नियमितपणे केली जाते. दूषित पाण्यामुळे नागरिकांना कोणतेही आजार जडू नये म्हणून महापालिकेकडून ही खरबदारी घेतली जाते.

या कामासाठी त्रयस्थ संस्थेची 2 वर्षांसाठी नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी 76 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच, महापालिकेच्या निगडी, सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील प्रयोगशाळेतही शुद्ध केलेल्या पाण्याची दररोज चाचणी केली जाते. या प्रयोगशाळेत रासायनिक व अनुजीव चाचण्या करणे, उपकरणे पुरवणे, बसविणे व त्या कार्यान्वित करण्यासाठी खासगी एजन्सी नेमण्यात येणार आहे. एका वर्षासाठी या कामासाठी 30 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news