पुणे : रिक्षाचालकाने स्वत:वर ब्लेडने केल्या जखमा

पुणे : रिक्षाचालकाने स्वत:वर ब्लेडने केल्या जखमा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्टेशन येथे नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या रिक्षावर कारवाई करत असताना महिला पोलिस अंमलदाराच्या हातातून ई चलन मशीन हिसकावून घेतले. त्यांना तुमच्याकडे बघून घेतो, असे म्हणून स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार करून जखमी करून घेण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून वृषभ बाबा पिसे (वय 23, रा. येरवडा) याला अटक केली आहे. याबाबत पोलिस नाईक दीपमाला नायर यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे रेल्वे स्टेशनच्या इन गेटजवळ सोमवारी दुपारी साडेबारा वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषभ पिसे हा रिक्षा घेऊन नो पार्किंगमध्ये थांबला होता. फिर्यादी या त्याच्याकडे असलेल्या ई चलन मशीनद्वारे कारवाई करत होत्या. त्या वेळी पिसे याने त्यांच्याकडील ई मशीन काढून घेतले. पोलिस उपनिरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.

चाकूच्या धाकाने खंडणीची मागणी

चाकूच्या धाकाने खंडणी मागणार्‍याला डेक्कन पोलिसांनी अटक केली. सूरज रोहिदास नलावडे (वय 33, रा. कोथरूड) याला अटक केली आहे. याबाबत 44 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार नलावडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.11) सायंकाळी सातच्या सुमारास कर्वेनगर येथील एका वाईनच्या दुकानात घडली. फिर्यादींचे कर्वेनगर परिसरात वाईनचे दुकान आहे. ते दुकानात असताना, आरोपी सूरज हा तेथे आला. त्याने प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये हप्ता आणि दररोज एक दारूच्या क्वार्टरची मागणी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सूरज याला अटक केली आहे.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news