एमएचटी सीईटी अर्जदारांना दिलासा! दुरुस्तीसाठी ‘एनटीए’कडून 20 मार्चपर्यंत संधी

एमएचटी सीईटी अर्जदारांना दिलासा! दुरुस्तीसाठी ‘एनटीए’कडून 20 मार्चपर्यंत संधी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलमार्फत एमएचटी सीईटी 2024 या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जामध्ये सुधारणा करण्याची सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे. अर्जात दुरुस्तीचा कालावधी दिनांक 20 ते 22 मार्च असून, या कालावधीमध्ये उमेदवारांनी स्वतःच्या लॉगिनमधून अर्जामध्ये सुधारणा करावी, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

सीईटी सेलच्या आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन केले आहे. काही उमेदवारांकडून अर्ज भरताना अनावधानाने विविध प्रकारच्या चुका झाल्या असून, त्या दुरुस्त करण्याबाबत या कार्यालयाकडे लॉगिनमधून, दूरध्वनी, ई-मेलद्वारे व प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन विनंती केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news