बेळगाव : पुणे-बंगळुरू महामार्गावर तिहेरी अपघात; दोघे ठार | पुढारी

बेळगाव : पुणे-बंगळुरू महामार्गावर तिहेरी अपघात; दोघे ठार

खानापूर; पुढारी वृत्तसेवा : भरधाव कंटेनरने रिक्षा आणि दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दोघे जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात पुणे-बंगळुरू महामार्गावर हुबळीजवळ आज (दि.१८) रात्री सव्वा आठच्या सुमारास घडला.

पुणे-बंगळुरू महामार्गावर हुबळीजवळ (एम एच १५ ईव्ही ६६००) या मालवाहू कंटेनरने रिक्षा व दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षामधील दोघेजण जागीच ठार झाले तर दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर कंटनेर चालकाने कंटेनरसह घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी बंकापूर टोलनाक्याजवळ हा कंटनेर आडवून चालकाला ताब्यात घेतले.

हेही वाचा : 

Back to top button