Ravindra Chavan : भाजपमध्ये बंडखोरी होत नाही; शरद लाड यांचा अर्ज 'डमी'च! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची स्पष्टोक्ती

Pune Graduate and Teacher Constituency Election : महायुतीचे पाचही उमेदवार विजयी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न
Ravindra Chavan
Ravindra ChavanPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे : भारतीय जनता पक्षामध्ये बंडखोरी होत नाही. शरद लाड यांनी भरलेला उमेदवारी अर्ज हा केवळ 'डमी अर्ज' म्हणून दाखल करण्यात आला आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे राहतील, अशी स्पष्टोक्ती देत पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील संभाव्य बंडखोरीच्या चर्चेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पूर्णविराम दिला.

पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी सोमवारी पुणे विधान भवन येथे उत्साही वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल केले.

Ravindra Chavan
Dr. Smita Yogesh Jadhav : भाजपच्या विकासगंगेत खारीचे योगदान देण्यासाठी माझी उमेदवारी! डॉ. स्‍मितादेवी योगेश जाधव यांचे भावूक उद्‌गार!

यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार हेमंत रासने, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, आमदार भीमराव तापकीर, माजी आमदार शरद लाड, माजी आमदार संग्राम जगताप, दीपकबाबा मिसाळ, जनसुराज्य शक्ती युवा संघटनेचे अध्यक्ष समित कदम, शेखर इनामदार, सदाशिव खाडे, 'दैनिक पुढारी'च्या सहव्यवस्थापकीय संचालिका डॉ. योगिता पाटील, प्रशांत कोल्हे, विजयसिंह माने यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, पुनीत जोशी, अजय खेडेकर, रवी काळेगावकर, जयप्रकाश पुरोहित, पल्लवी जावळे, महेश वाबळे, किरण दगडे पाटील, पृथ्वीराज सुतार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ravindra Chavan
Dr. Smita Yogesh Jadhav : डॉ. स्मिता योगेश जाधव यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

चव्हाण म्हणाले, "महायुतीच्या माध्यमातून दोन्ही मतदारसंघांसाठी उच्चशिक्षित उमेदवार देण्यात आले आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांकडे प्र-कुलगुरू म्हणून काम करण्याचा मोठा अनुभव आहे. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये काम करताना येणाऱ्या अडचणींची जाणीव आणि सरकारशी उत्तम समन्वय साधण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे शिक्षक आणि पदवीधरांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवणे त्यांना सहज शक्य होईल." शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणारे तरुण कार्यकर्ते असून, शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने लढा देत असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. "दोन्ही उमेदवारांना महायुतीच्या माध्यमातूनच उमेदवारी देण्यात आली असून, त्यांना विजयी करण्यासाठी महायुतीचे सर्व घटक एकत्रित प्रयत्न करतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ravindra Chavan
Dr. Smita Yogesh Jadhav | डॉ. स्मिता जाधव यांच्या उमेदवारीचे सांगलीत स्वागत

नाराजांची समजूत काढणार

बंडखोरीच्या प्रश्नावर बोलताना चव्हाण म्हणाले की, महायुतीतील इच्छुकांची नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत. "प्रत्येक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी अर्ज भरले आहेत. अनेक कार्यकर्त्यांची आम्ही समजूत घातली असून, ते महायुतीचेच काम करणार आहेत. काही ठिकाणी भरलेले अर्ज हे आम्हीच 'डमी अर्ज' म्हणून दाखल करण्यास सांगितले होते. महायुतीचे कार्यकर्ते १०० टक्के महायुतीसोबतच राहतील. मतदार नोंदणी प्रक्रियेत कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली असून, या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर सर्व उमेदवारांचा विजय सुकर होईल. महायुतीतील नाराजांची समजूत काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व प्रमुख नेते पार पाडतील. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह नागपूर आणि अमरावतीतील जागांवरही महायुतीचे उमेदवार आणि कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतील," असा दावा त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news