Dr. Smita Yogesh Jadhav : भाजपच्या विकासगंगेत खारीचे योगदान देण्यासाठी माझी उमेदवारी! डॉ. स्‍मितादेवी योगेश जाधव यांचे भावूक उद्‌गार!

भारतीय जनता पक्षात प्रवेश : पुणे पदवीधर मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्‍हाण यांच्या हस्‍ते एबी फॉर्म प्रदान
डॉ. स्‍मितादेवी योगेश जाधव
डॉ. स्‍मितादेवी योगेश जाधव
Published on: 
Updated on: 

Dr. Smita Yogesh Jadhav पुणेः "विकसित भारताचे स्वप्न येणाऱ्या काळात कोण पूर्ण करू शकेल? तो फक्त भाजपच पूर्ण करू शकेल हा माझा ठाम विश्वास आहे. मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्‍वाखाली राज्य व देशात गेल्या १२ वर्षांत जी प्रगती झालेली आहे, त्यामुळे माझा हा आत्‍मविश्वास निर्माण झालेला आहे. माझ्या आणि माझ्या पुढच्या पिढीच्या महत्त्वाकांक्षाचे प्रतीक म्हणजे भाजपच आहे. या विकासाच्या गंगेत आपले खारीचे योगदान देता यावे यासाठी मी भाजप पक्षात प्रवेश करत असून त्‍यासाठीच पदवीधर मतदार संघातील माझी उमेदवारी आहे." असे भावपूर्ण उद्‌गार पुणे पदवीधर विधानपरिषद मतदार संघातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार तथा दै. पुढारी पब्‍लिकेशनच्या संचालिका, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र - कुलगुरु डॉ. स्‍मितादेवी योगेश जाधव यांनी काढले.

डॉ. स्‍मितादेवी योगेश जाधव यांनी रविवारी भारावलेल्या वातावरणात पुण्यातील भाजपच्या पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी त्या आपल्या भावना व्यक्‍त केल्या. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्‍हाण यांच्या हस्‍ते डॉ. स्‍मितादेवी योगेश जाधव यांना एबी फॉर्म देण्यात आला.

डॉ. स्‍मितादेवी योगेश जाधव
Dr. Smita Yogesh Jadhav : पुणे पदवीधरमधून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना भाजपची उमेदवारी जाहीर

याप्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे राज्य संघटनमंत्री राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे अध्यक्ष समित कदम, शेखर इनामदार, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्‍तुभ गावडे, माजी आमदार जगदीश मुळीक, शरद लाड, डॉ. प्रशांत कोल्‍हे, सदाशिवजी खाडे, शितलताई पाटील आदी मान्यवर उपस्‍थित होते.

डॉ. स्‍मितादेवी जाधव म्‍हणाल्या, "'एक भारत, श्रेष्ठ भारत' आणि 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' ही भारतीय जनता पक्षाची विचारधारा आहे. 'राष्ट्र प्रथम' ही जाणीव मनात ठेवून कार्यरत असलेल्या भाजपमध्ये प्रवेश करताना माझ्या मनात समाधानाचे भाव आहेत. त्याचबरोबर पूर्ण ताकदीने काम करण्याची आणि उत्साहाने काम करण्याची माझी तयारी आहे.

त्या पुढे म्‍हणाल्या, या जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश देत कामाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजी, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादाजी, केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोहोळजी, त्याचबरोबर राजेश पांडेजी, धीरजजी घाटे, समीतजी कदम, शेखरजी, कौस्तुभजी, जगदीशजी, योगेशजी टिळेकर, सदाशिवजी खाडे, शितलताई पाटील, शरदजी लाड व प्रशांतजी कोल्हे या सर्व लोकांचे मनापासून आभार मानते.

डॉ. स्‍मितादेवी योगेश जाधव
Dr. Smita Yogesh Jadhav : डॉ. स्मिता योगेश जाधव यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

लोकसंख्या ही भारताची ताकद...

आजचा भारत हा तरुणाईचा भारत आहे. २०४० पर्यंत ही लोकसंख्या लाभांश आपली ताकद असणार आहे. माझ्या सुदैवाने गेली दोन दशके मी तरुण घडवणाऱ्या शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. राजकीय वाटचाल करताना आजच्या युथसोबत काम करायची मला नक्कीच संधी मिळेल अशी मी आशा व्यक्त करीत असल्याचे डॉ. स्‍मितादेवी यांनी यावेळी सांगितले.

लग्‍नानंतर मी ‘पुढारी’ परिवाराची भाग झाले....

लग्नानंतर मी ‘पुढारी’ परिवाराची भाग झाले. जनतेचा आवाज बनून लोकांचे प्रश्न कसे मांडायचे, त्यांच्या भावना सरकारसमोर कशा ठेवायच्या, हे मी २५ वर्ष शिकत आलेले आहे. ‘कस्तुरी क्लब’ व आमचा महिलांचा समूह असेल, ‘टोमॅटो एफएम’ व ‘आपला एफएम’ या साऱ्यांच्या उपक्रमातून हा वारसा मी पुढे चालवत आहे. मला आनंद आहे की पक्षाने पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून माझी निवड केली. आपली ही भूमी हिंदवी स्वराज्याची भूमी आहे आणि आपली सर्वांची प्रेरणा असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री आई, कर्मवीर भाऊराव पाटील आणि महर्षी कर्वे यांनी शिक्षणगंगा आणली, याच भूमीतून पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने दिली आहे. माझ्यासाठी हा खूप भावुक क्षण आहे आणि ही खूप मोठी जबाबदारी आहे, असे ही त्यांनी सांगितले.

आजोबा आणि वडिलांचा वारसा ताकद देईल

शिक्षणाचा हा दमदार वारसा माझे आजोबा डॉ. डी. वाय. पाटील आणि वडील डॉ. पी. डी. पाटील यांनी समर्थपणे पुढे नेला आहे. पदवीधरांच्या आशा-आकांक्षांना पुरेपूर न्याय देण्यासाठी हा वारसा मला ताकद देईल असा माझा विश्वास आहे. या समाजसेवेच्या नव्या क्षेत्रात प्रवेश करताना तुम्ही सगळ्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन कायम माझ्यासोबत राहू दे अशी अपेक्षा डॉ. स्‍मितादेवी जाधव यांनी यावेळी व्यक्‍त केली.

कोल्हापूर माझी जन्मभूमी तर पुणे कर्मभूमी ....

कोल्हापूर ही माझी जन्मभूमी आहे तर पुणे ही माझी कर्मभूमी आहे. ‘कस्तुरी’ आणि ‘पुढारी’च्या माध्यमातून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात सुरू असलेल्या महिला संघटना आणि सामाजिक कार्य या सगळ्यांमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात समाजसेवा करता येईल. असे भावपूर्ण उद्‍गार ही डॉ. स्‍मितादेवी योगेश जाधव यांनी काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news