

शिवनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मागितलेली माहिती तातडीने का दिली नाही, या रागातून कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रंजन तावरे यांनी कार्यकारी संचालक (एमडी) अशोक पाटील यांना शिवीगाळ केली असल्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले. या प्रकारानंतर कामगारांनी सभा घेऊन रंजन तावरे यांचा तीव— निषेध केला. कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, माजी अध्यक्ष ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, योगेश जगताप, नितीन सातव, अनिल तावरे, सागर जाधव, मंगेश जगताप, बन्सीलाल आटोळे, संजय काटे, प्रताप आटोळे, आदींसह अधिकारी व कामगार उपस्थित होते.
या वेळी बोलताना अध्यक्ष जगताप म्हणाले, माजी अध्यक्ष राहिलेले संचालक रंजन तावरे यांनी कार्यकारी संचालक अशोक पाटील यांना शिवीगाळ करणे तसेच मारहाण करण्याची भाषा वापरणे हा प्रकार निंदनीय असून, याचा जेवढ्या कडक शब्दात निषेध करावा तेवढा थोडाच आहे. माजी अध्यक्ष, जेष्ठ संचालक बाळासाहेब तावरे यांनीदेखील कार्यकारी संचालकांना शिवीगाळ करणे हे नैतिकतेत बसत नाही. सर्वांनीच एकोप्याने आणि समजून काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
संचालक नितीन सातव यांनी झालेला प्रकार हा दुर्दैवी असल्याचे सांगून रंजन तावरे यांचा निषेध केला. योगेश जगताप यांनी कारखान्याची एक वेगळी परंपरा आहे. अनेक नामवंतांनी या कारखान्याची धुरा सांभाळली असून, कुठे गालबोट लागेल असा प्रकार झालेला नाही, त्यामुळे रंजन तावरे यांच्याकडून झालेली शिवीगाळ अयोग्य आहे, असे योगेश जगताप यांनी सांगितले.
या वेळी कामगार संचालक सुरेश देवकाते, राजेंद्र तावरे, शेखर जगताप आदींनी निषेध व्यक्त करून मरंजन तावरे हाय… हायफ च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या शिवीगाळीमुळे कारखाना कामगार आणि सभासदांमध्ये अत्यंत तीव— संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा