परभणी: आकाश खांडेकर यांची पशुधन विकास अधिकारीपदी निवड | पुढारी

परभणी: आकाश खांडेकर यांची पशुधन विकास अधिकारीपदी निवड

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : शेती प्रपंच सांभाळून गंगाखेड साखर कारखान्यात शेती विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मुलाने पहिल्याच प्रयत्नात वर्ग १ राजपत्रित अधिकारी पदाला गवसणी घातली.

गंगाखेड साखर कारखान्यात कार्यरत असलेल्या अशोक खांडेकर यांचा मुलगा आकाश याने २७ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात ८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत पशुधन विकास अधिकारी (राजपत्रित) होण्याची किमया साधली आहे.

आकाश याने प्रचंड जिद्द, इच्छाशक्ती व मेहनतीने अवघ्या २७ व्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात तेही राज्यात ८ व्या क्रमांकासह उत्तीर्ण होण्याचा पराक्रम केला आहे.  या अभूतपूर्व यशाबद्दल तालुक्यातून आकाशवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.

हेही वाचा :

Back to top button